पान:Samagra Phule.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० महात्मा फुले : समग्र वाङ्मय अशा तहेच्या ढोंगी लोकां शिक्षक नेमिती । सुधारले शहाणे ह्मणवीती ॥ वाघ मेंढक्याकरितां करती खांडाची बढती । जळामधीं पक्षी जसे उडती ॥ सुधारले मंडूक सर्पा ज्ञान शिकविती ॥ ज्ञानाने झाली उपरती ॥ इंग्लिशांच्या मेहरीपुरते सुधारले बनती। घरामध्ये दगडी पुजिती। ॥ चाल ॥ नेमा गुरु अन्य जातीचे ॥ नमूने सात्विक ज्ञानाचे। शिकवी काम पंतोजीचे ।* निवळ माळ्या कुणब्याचे । दुसरे महार मांगाचे । बीस घ्या अनुभवाचें ॥ ॥ चाल ॥ वृक्ष मग देईल फळास हो । सुख मग होईल शुद्रास हो। लाजवा भुंदेवास हो ॥ शूद्र मुलाची दाद नाही जोती मनामधीं झुरती ॥ दुसरे खिस्ती तरफडती॥ सुधारले ह्मणविता आतां तुम्ही आमचे भूपती । मुलें भलत्यांची शिकती॥

  • टीप : 'शिकवी काम पंतोजीचे' या ओळीऐवजी डॉ. रोझलिंड ओ' हॅनलन यांनी दिलेल्या

माहितीनुसार जून १८६९ च्या सत्यदीपिकेच्या अंकात ब्याण्णव पानावर 'शिकवा क्लास पंतोजीचे' अशी ओळ छापलेली आहे. [पहा : पुरोगामी सत्यशोधक : जानेवारी ते मार्च १९८४, पृष्ठ २४ व ३१] समाप्त- सागर