पान:Samagra Phule.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ORIGINAL POETRY Our Brhamin-ridden Policy-Educationl System (Communicated) पवाडा (लिहून पाठविलेला) "विद्याखात्यांतील ब्राह्मण पंतोजी" त्याचा माल त्याचे हाल पडल्या पठाणाच्या पंक्ति । मुले ती भलत्यांची शिकती॥ माळी कुणबी शेती खपून करती पट्टीची भरती । मिळेना लंगोटी पुरती ॥ लहान चिटकूली पोरे करिती ढोरांच्या वळती । जोडे नाहीं पाय पोळती॥ शिकण्याला वेळ नाही पिते मनामध्ये झुरती । दोष पाहा देवाला देती। विद्या देण्याची थाप देऊन रयत नाडीती। द्वीज पंतोजी धाडीती॥ कुळकरण्याची मदत थोडी पोरें जमविती । संख्या रपोटांत लिहिती ॥ महाअरीच्या पोरा शिकविणे विटाळ मानीती। इंग्रजा शेकह्यांड करिती ॥ ॥ चाल || चाकरी पंतोजीची करी । लाज नाहीं धरता दुरदुरी। आतां का तुमचे महा अरी। दास वा तुमचे परोपरी । लाजली अमेरिका जरी। नव्हती भू देवापरी ।

  • "सत्यदीपिका' जून १८६९, पृष्ट-८६-९२

+ महाराच्या