पान:Samagra Phule.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ८१ ॥ चाल ॥ भिडस्त भारी । साबडा घरीं ॥ प्रिय मधुरी । भाषण करी ॥ मोठा विचारी । वर्चड करी ॥ झटून भारी । कल्याण करी ॥ आप्त सोयरीं । ठेवी पदरीं । लाडावरी । रागावे भारी ॥ इंग्लीश ज्ञान होतां म्हणे मी पुत्र क्षेत्र्यांचा । उडवी फट्टा ब्रम्हयाचा॥ जोतीराव फुल्याने गाईला पुत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा॥ जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पोवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥८॥ -समाप्त- अभंग सत्ता तुझी राणीबाई । हिंदुस्थानी जागृत नाहीं ॥१॥ जिकडे तिकडे ब्राह्मणशाई । डोळे उघडूनी पाहीं ॥२॥ खेडेगांवी कुळकर्णी । आहे लेखणीचा धणी ॥३॥ माहालामध्ये महालकरी । जसा अष्ट अधिकारी ॥४॥ यमवत मामलेदार । शुद्रा शिक्षा अनीवार ॥५॥ धूर्त चिटणिसांचे पुढे । काय कलेक्टर बापुडे ॥६॥ रेविन्युची दप्तरदारी । ब्राह्मण किती अधिकारी ॥७॥ चहूकडे भटभाई । कुणब्याची दाद नाहीं ॥८॥ जोती म्हणे धाव घेई । दुष्टापासूनी सोडवी ॥९॥ -समाप्त- एच-२२