पान:Samagra Phule.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ६७ सर्व तयारी केली राजपद जाडी नांवास । शिक्का सुरू मोर्तबास ॥ अमदानगरी नटून पस्त केलें पेठेस । भौती औरंगाबादेस । विजापूरची फौज करी बहुत आयास । घेई कोकणपटीस ॥ सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सर्वांस ॥ जळी फौज लढे भौती मारी गलबतास । दरारा धाडी मक्केस ॥ माल्वणी घेऊन गेला अवचित फौजेस । पुकारा घेतो मोगलास ॥ जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥ जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास । लुटलें मोंगल पेठांस ॥ पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥ स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । निघाला मुलखी जायास ॥ मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास । लागले अखेर कडेस ॥ औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास दुसरे दिलीरखानास ॥ ठेविले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेढिलें बहुतां किल्ल्यांस ।।