पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग चवथा- く。 बापावरच असतो. अशा संततीचे विवाह झाले नाहींत म्हणून काय झालें ! या गोष्टीचा विचार आईबापांनीं अवश्य करावा. लग्न जमविण्यांत एक प्रकारचे पुण्य आहे, अशी समजूत असल्यामुळेकिंवा मध्यस्थांच्या द्रव्यलोभामुळे-इकडे बोलावयास नको व तिकडे चालावयास नको, अशा प्रकारचे विवाह कित्येक वेळां होतात, पण तें बरें नाहीं. २३ पुरुषांस-एकवार विवाहित झालेल्या पुरुषांस-तर या लग्नाचे म्हणजे दुसरा विवाह करण्याचे किंवा दुसरी बायको वारल्यास तिसरा विवाह करण्याचें, वेड लागल्यासारखें दिसतें; पण तें चांगलें नाहीं, त्यांनींही दोन्ही बाजूंचा नीट विचार करून मग काय करणें तें करावें. २४ विचारी मनुष्यानें तरी लहानपणीं किंवा प्रौढ होण्यापूर्वी, आपल्या पायांत सवामणाची बिडी अडकवून घेणें चांगलें नाहीं. आईबापांनी आपल्या मुलांवर या बाबतींत सक्ती करूं नये. कारण विवाह झाल्यावर, मुलांच्या प्रगतीस अडथळा येतो. ज्यांच्या * आशा मोठ्या आहेत, किंवा महत्वाकांक्षा प्रवळ आहेत, अशा माणसांस सुटें राहिल्यास, आपल्या उन्नतीचे अनेक प्रयत्न करितां येतात; लांबलांबचे मुलुख पाहून आपल्या ज्ञानांत व अनुभवांत भर घालतां येते; परंतु ते विवाहपाशानें बद्ध झाल्यास, त्यांच्यार्ने तसें कांहीं कार्य होणें मोठ्या मुष्किलीचे होतें. २५ समाजांत माणसांचा तोटा असला, व संपत्तीचा पुरवठा । असला, म्हणजे प्रत्येकानें विवाह केला तरी चालण्यासारखें असतें. पण याच्या उलट स्थिति असल्यावर, विवाह करणाराची पुष्कळ वेळां फजीती होते. विवाह झाला म्हणजे प्रथम जेथे एका पोटाची काळजी असते, तेथे दोन पोटांची काळजी उत्पन्न होते, व पुढे खाभाविकपणे सुरू होणारा संततीचा खटाटोप सुरू झाल्यावर, ती याहीपेक्षां वाढते. अशा वेळीं उभयतां मातापितरें श्रम करणारी असून, निर्वाहास लागणाच्या साधनांचा पुरवठा करणारी असल्यास &