पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

く。 आईबापांचा मित्र. मात्र सर्वे गोष्टी नीट चालतात, नाहींतर जगांत फटफजीती उडण्याची वेळ येते. आपल्यास खाण्यापिण्यास नीट मिळत नाहीं, संततीची जोगवण नीट करितां येत नाहीं, लोकांपुढे तोंड वेंगाडण्याची व हात पसरण्याची वेळ येते, यासारखी लज्जास्पद व हृदयविदारण करणारी दुसरी गोष्ट कोणती ? याकरितां लप्त करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा अवश्य विचार करावा. २६ जगांत प्रथमत: आपला खतांचा टिकाव कसा लागेल, हें पाहिलें पाहिजे. आपण आपला निर्वाह करूं, इतकी हिंमत असल्याशिवाय लग्न करणे चांगलें नाहीं. पण इतकी हिंमत आल्यावरही थोडाबहुत अवकाश धरणें चांगलें. साळ्याची गाय, माळ्याचे वांसरूं, अशा पद्धतीनें सर्व तयारी करून, लग्न करून घेणारांस लझापासून मिळणारें खरें सुख प्राप्त होत नाहीं. आपली प्राप्ति संसार थाटावयास साधारणपणें पुरेल, अशी असली पाहिजे. कर्ज काढून लग्न करणें चांगलें नाहीं. लग्नापूर्वी-पुढे लग्न करावयाचे आहे हें ठाऊक असून-जर लग्नापुरते पैसे आपणांस शिल्लक ठेवितां आले नाहीत, तर लग्न झाल्यावर, मग तो पैसा आपण फेडूं, हें अनुमान कशाच्या जोरावर करावयाचे ! अशा प्रकारच्या लझानें आपणांस सुख व्हावयाचें एकीकडे राहून, एकाच्या ठिकाणीं दोन माणसें दु:ख भोगण्यास तयार होतात, इतकेंच काय तें ! २७ विवाह करितांना आपली प्राप्ति, निदान आपण, आपली बायको, व एक दोन मुलें, यांस पुरण्यासारखी असली पाहिजे; नाहीतर आपली प्राप्ति उत्तरोत्तर वाढणारी तरी असली पाहिजे. मनुष्यास सर्व आयुष्यभर सारखा पैसा मिळत नाही. त्यास तरुणपणांत श्रम करवतील तसे ह्यातारपणांत करवणार नाहीत, यामुळे त्यास पुढे पुढे कमी पैसा मिळण्याचा संभव असतो. संसार वाढता असतो. त्यास एकसारखी अधिक पैशाची जरूरी लागत असते. याकरितां आपण प्रथमपासून जपून वागण्यास शिकलें पाहिजे. ー 。 लु करतांना स्त्रीच्या नुसत्या खरूपाकडे लक्ष देण्यापेक्षां, ती शरीरानें सशक्त आहे किंवा नाहीं, तिला संसाराची कामें