पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग दुसरा- ३९ आपल्या सोईकरितां जागीं करणें, किंवा झोंप मोडून भरवावयास लावणें, ह्या सर्व चाली सारख्याच वाईट आहेत, ह्या टाळवतील तेवढ्या टाळाव्या. १४ मुलें लहान असतांना त्यांस आईबापांचा राग आपल्यावर कां झाला, याचे कारण कळणे कठीण असतें. याकरितां त्यांस तसें कळू लागेपर्यंत त्यांच्यावर रागावू नये, हें चांगलें. आईबापांच्या असल्या वागणुकीचा-उगीचच्या उगीच रागावण्याचा-किंवा चापट लगावण्याचा, परिणाम मुलांवर अगदींच घडत नसेल, असें ह्मणवत नाहीं, पण तो इष्ट परिणाम नसतो, यांत मात्र संशय नाहीं. आईबापांच्या दरडावणीनें मूल भितें, व तें रडावयास लागतें. पण तें आपलें काम-खोड्या करण्याचें-सोडून देतें, असें मात्र आढळत नाहीं. याकरितां या वयांत त्यांस रिकामा त्रास देऊं नथे. त्यांस उद्योग करावा किंवा उलाढाल करावी, इतकें मात्र समजत असतें व त्याप्रमाणें तें एकसारखें वापरत असतें. आपल्या वापरण्याचा परिणाम काय घडेल इकडे त्याचे लक्ष नसतें, किंवा त्याबद्दल त्याला ज्ञान नसतें. त्याचा प्रखेक प्रयत्न घरांतल्या माणसांना नावडणाराच असतो; कारण त्यापासून घरांतल्या माणसांचे काम वाढत असतें, पण त्याला खा अभैकाचा कांहीं इलाज नसतो. एखादी वर्तु आढळली ह्मणजे ती तें तोंडांत घालणार; मग ती तोंडांत घालण्यासारखी असो वा नसो; ती तोंडांत घातल्यापासून अपकार होवी किंवा उपकार होवो; वसुतु बिघडो किंवा खराब होवो; त्याचा विचार ल्यास नसतो. त्याला कळत नाहीं, ह्मणून त्यावर रागावण्यांत अर्थ नाहीं. भलती वसुतु त्याच्या हातास लागूं नये, ह्मणून योग्य ती खबरदारी आईबापांनीं प्रथमच ठेवावी, हें बरें. १५ मुलें जसजशीं वाढत जातात, तसतशीं तीं वेगळ्या वेगळ्या खोड्या करतात, तरी त्यांत त्यांचा वावगा हेतु कांहीं नसतो. दृष्टीस पडणाच्या पदार्थोपासून मिळणारें खाभाविक ज्ञान मिळवावें, एवढाच त्यांचा हेतु असतो. एखादी वस्तु हातांत मिळाली की ती