पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


३४ आईबापांचा मित्र. क्रम सोडणार नाहीं. फार त्रास झाला तर तें रडू लागेल. पण आपण त्यास न उचलतां किंवा अडथळा न करितां पायच्यांवर जाऊं दिलें, तर तें मूल न पडतां बहुधा पायच्या उतरून जाईल; नाहीं तर तेथून परत फिरेल. कधी कधीं तें पडण्याचा संभव असतो, याकरितां आपण जवळ राहून त्यास मदत करण्यास तयार असावें. तें आपला मागै बहुधा सावधपणानें क्रमीत असतें, असा पुष्कळ वेळां अनुभव येतो. याकरितां आपण त्याच्या खाभाविक प्रवृत्तीस बहुधा आड येऊं नये. ह्याच्या जवळ असावें, व प्रसंग पडल्यास त्यास मदत करावी. १२ एखादी तापट आई असली ह्मणजे ती मुलास तोंडानें उगाच अपशब्द बोलते, त्यास मागें आणून आपटते, किंवा त्या कोमल अभैकास उगीच एखादी चापटी लगावते ! यापैकी कांहीं झालें, तरी तें फार वाईट. लहान मुलांची हुरूप जबर असते. तीं नेहमी नवीन व्यवसाय करीत असतात. दुनियेंतील पदार्थाचा अनुभव घेत असतात. आपली शक्ति अजमावृन पाहात असतात. त्यांस रागाचे व लोभाचे कारण बरोबर समजण्याचे ज्ञान नसतें, याकरितां त्यांस त्रास देणें निरुपयोगी असतें. ह्मणून त्यांस रिकामा अडथळा करूं नये, द्टाऊं नये, भीति दाखवू नये, किंवा विनाकारण चापट मारूं नये. अपाय घडण्याचा संभव दिसल्यास मदत करण्यास मात्र तयार असावें. १३ मुलें एका जागीं बसतात, तेव्हां त्यांनी फिरावें, असें आईबापांस वाटतें; पण ती फिरूं लागलीं, लयांस आटपतां आटपतङ्गं पुरेसें होऊं लागलें, ह्मणजे तेंही ह्यांस सहन होत नाहींसें होतें ! मुलें उभी राहण्याच्या आधीं उभीं करणें, बसण्याच्या पूर्वी त्यांस बसावयास लावणें, चालू लागण्याच्या पूर्वी त्यांस बुद्ध्या चालवणे, या गोष्टींची किल्लेक आईबापांस मोठी आवड असते; पण या सर्व गोष्टी जशा वाईट आहेत, तशाच ती घांबूं पळू *"ॐवर यसि धांवण्यापळण्याची मनाई करणे, एका ठिकाणीं आग्नहोनें बसवणें, झोंप येत नसतां निजविणें, निजलेली असल्यास