पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग पहिला- U) अहितच व्हावयाचे, हें लक्षांत ठेवून आईबापांनी कोणत्याही व्यसनास सहसा थारा देऊं नये १० सामान्य गोष्टी. १ ज्या ज्या वेळीं ज्या ज्या शिक्षणाच्या सोई असतील, त्या त्या वेळीं तें तें शिक्षण साधेल तितकें आईबापांनीं संपादन करावें, ह्यणजे त्यांस शिक्षणाची गोडी लागेल, त्याची किंमत कळेल, आपल्या संततीस शिक्षण देण्याकडे त्यांची साहजिक प्रवृत्ति होईल, व आपल्या संततीच्या शिक्षणास त्यांस खतां मदत करितां येईल. २ आईबापांनी आपलें आचरण नीतिशुद्ध व खधमौस अनुसरून ठेवण्याचा नेहमीं प्रयत्न करावा, ह्यणजे संततीस नीतिशिक्षणाचा व धर्मशिक्षणाचा कित्ता घरांतच मिळेल. मुलांच्या दृष्टीसमोर असणारें आईबापांचे नीतिशुद्ध आचरणाचें वळण, त्यांच्या संततीस सहज लागेल. मुलें अनुकरणप्रिय असल्यामुळे आईबापांच्या शुद्ध आचरणाचा ठसा त्यांच्यांत-अंशत: तरी-उठल्याशिवाय राहणार नाहीं. आईबापांचे सर्वच गुण घेऊन तीं उठतील, असें ह्यणतां येणार नाहीं, पण कांहीं तरी सद्गुणांचा ठसा त्यांच्यांत प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहणार नाहीं. - ३ आईबापांची संगति मुलांस निल्य असते, तरी तीं मोठी होऊँ लागलीं, बाहेर हिंडूं फिरूं लागलीं, ह्मणजे त्यांच्या दृष्टीसमोर नित्य नव्या नव्या व विचित्र व्यक्ति येणारच; त्यांत कित्येक चांगल्या तशा किल्लेक वाईटही असणारच; यामुळे त्यांच्या आचरणाच्या छटा मुलांवर मुळींच उमटणार नाहीत, असें ह्मणतां येणार नाहीं. पण आईबापांस सद्गुणांची प्रीति व दुर्गुणांचा तिटकारा वाटत असल्यास, इतरांच्या आचरणाचा परिणाम मुलांवर विशेष होणार नाहीं. ४ सांगण्याचे तात्पर्य इतकेंच की ‘संतति वाईट' अशी रिकामी कुरकुर न करतां प्रथम आपण आपली सुधारणा करावी, संततीवर काळजीपूर्वक योग्य नजर ठेवावी; ह्मणजे संततीस वाईट ह्मणण्याचा