पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. R৭ पक्वान्ने झोडून सर्वखाचा फडशा उडवावा, व संततीस साधे अन्नही वेळेवर मिळण्याची पंचाईत पडावी, असेंही होतां उपयोगीं नाहीं. साध्या अन्नानें व खच्छ पाण्यानें जर आमचे आयुरारोग्य यथास्थित राहूं शकतें, तर असल्या आडमागांत आम्हीं कां शिरावे ? अशा रीतीनें द्रव्याचा व्यर्थ व्यय करूंनये. सामथ्र्ये असल्यास गरीबगुरिबांचा समाचार घ्यावा. ज्यांस मुळींच खावयास मिळत नाहीं, लयांस एकवेळ खावयास घालण्यांत जर आपल्या द्रव्याचा व्यय केला, तर तीं माणसें खास आपल्यास दुवा देतील. ६ तरणेताठे गडी,गलेलठ्ठमंडळी, व्यसनाच्या नादानें सुदामदेव बनलेली कोणी पाहिली नाहीं ? गुलाबी गाल, फिरलेले दंड, हे व्यसनाच्या तडाक्यांत सांपडल्यावर सुरकुतलेले किंवा खोल गेलेले कोणीं पाहिले नाहींत ? व्यसनासारखें शरीरसंपत्तीची हानि करणारें दुसरें कारण सांपडणार नाहीं. व्यसनी मनुष्यास व्यसनासाठीं अधिक पैसा खर्चावा लागतो. त्याच्याजवळ असलेला पैसा हळूहळू खचून जातो. नवा मिळविण्याचें सामथ्ये असल्यास कांहीं सोय असते, नाहींतर मोठी पंचाईत पडते. व्यसनाचा अंमल अधिकाधिक बसू लागला, म्हणजे त्याचे सामथ्यै बहुधा कमी होऊं लागतें. यामुळे उत्तरोतर त्याच्या विपत्तीस भरती येऊं लागते. ‘बुडल्याचा पाय खोलांत’ या म्हणीप्रमाणे त्याची अवस्था होते. पैसा कमी झाला किंवा कमी मिळू लागला, म्हणजे व्यसनी मनुष्याच्या स्थितींत सुधारणा व्हावी असे वाटतें, पण तसे घडत नाहीं. तो उत्तरोत्तर जास्त व्यसनाधीन बनतो, चोरीसारख्या कित्येक दुर्गुणांचा त्यास मोह पडतो; व कड्यावरून सुटलेला पदार्थ जसा। उत्तरोत्तर जास्त गुरुत्वशक्तीच्या अधिक ताब्यांत सांपडल्यामुळे अधिक पराधीन होतो, त्याप्रमाणें व्यसनाधीन मनुष्य उत्तरोत्तर अधिक व्यसनमग्न होतो; व गुरुत्वशक्तीच्या ताब्यांत सांपडलेला पदार्थ जसा शेवटीं जोरानें जमिनीवर आदळून फुटल्याशिवाय राहात नाहीं, तसा व्यसनाधीन मनुष्य शेवटीं नाश पावल्याशिवाय राहात नाहीं. ३