पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

– 家3 आईबापांचा मित्र. केलेली आपल्यास माहीत आहे; भांगेचे लोटे पिऊन बेहोष झालेलीं माणसें आपल्यास केव्हां केव्हां दिसतात, व दारूच्या पायीं गटारांत लोळणारी माणसें आहेत असें ही ऐकावयास येतें; हीं व्यसनें व्यसनें म्हणून गाजलेलींच आहेत, तेव्हां यांपासून दूर राहाण्याबद्दल वेगळे सांगावयास पाहिजे असें मुळीच नाहीं. कोणत्याही धर्मात व्यसनें हीं त्याज्यच मानली आहेत, तेव्हां त्यांचा संपर्क न लागूं देण्याविषयीं प्रत्येक आईबापानें झटून प्रयत्न करावा. ५ लहान व्यसनें जर त्याज्य आहेत, तर त्यापेक्षां मोठ्या दर्जाचीं व्यसनें-अफू, भांग, गांजा, दारू-त्याज्य आहेत, हें काय सांगावें ? खरोखर पाहिल्यास मनुष्याच्या जीवितास फार थोड्या वस्तूंची अपेक्षा असते. साधे जेवण व खच्छ पाणी यांपासून त्याच्या जीवितयात्रेची सर्व तजवीज लागते. आपल्या श्रीर्मतीप्रमाणें कोणी खर्च करूं नये, सर्वीनी दरवेशासारखें वागावें, असा या म्हणण्याचा भाव आहे, असें नाहीं. ज्याच्याजवळ ऐश्वर्य असेल, त्याणे त्याचा खुशाल उपभोग घ्यावा, पण तो व्यवस्थित रीतीनें ध्यावा. त्या उपभोगानें त्याच्या शरीरसंपत्तीस अपाय होऊं नये, किंवा त्याच्या कुटुंबाचा किंवा मुलाबाळांचा घात होऊँ नये. कोणींही केवळ आपलपोटें बर्नू नये. माझ्या दैवानें मिळालें आहे, मी त्याचा उपभोग घेईन, पाठीमागें कांहीं कां होईना, असल्या वेडगळ विचारांच्या खाधीन होऊं नये. आपल्या आईबापांच्या दयेनें आपलें रक्षण झाले व आपण थोर झालों, त्याप्रमाणेच आपल्या संततीकरितां आपण कष्ट सोसले पाहिजेत. गाड्याघोडीं बसावयास असली तर त्यांत बसू नये, असें कोणी म्हणत नाहीं; पण गाड्याघोडीं उडवण्यांत चूर होऊन, आपलें सर्वख गमावण्याची वेळ येणें चांगलें नाहीं. अनेक पकाने खाण्याचे सामथ्यै असल्यास ती खुशाल खावीं; पण त्यापासून शरीरपुष्टि प्राप्त झाली पाहिजे; तोंडाला अरुचि पडण्याचा प्रसंग येतां उपयोगी नाहीं; किंवा पक्वान्ने खाण्याच्या चटीनें साध्या अनासही महाग होण्याचा प्रसंग येतां कामा नये. वडिलांनीं