पान:Aagarakar.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

७०

कारी अधिकाधिक सक्ती करितात तो तों प्रजेच्या अंगीं अधिकाधिक सहन- शीलता येत जाते, व जों जों ही वाढत जाते तों तों अधिकान्यांस अधिका- धिक जुलूम करण्यास सवड होते. अशा रीतीनें एका बाजूनें औद्धत्य आणि दुसऱ्या बाजूनें नम्रता; एका बाजूनें चैन व दुसऱ्या बाजूनें कट; एका बाजूनें स्वामित्व आणि दुसन्या बाजूनें गुलामगिरी यांची अधिकाधिक वाढ हात गेल्यास, उत्पादक लोकांची संख्या आणि त्यांनीं केलेलें उत्पन्न ह दोनही संपुष्टात येऊ लागतात. हळू हळू साऱ्यांसच कमीअधिक भिकारपण येऊन लोकसंख्येची वाढ खुंटते; आणि असाच प्रकार अधिकाधिक होत गेल्यास ती कमी होऊं लागून अखेरीस समूळ -हासाच्या पंथास लागते ! तेव्हां लक्षांत काय गोष्ट ठेवायची की, समाजाची उन्नति होण्यास एका प्रकारची नियामक व्यवस्था जरी अत्यावश्यक आहे, तरी ती फाजील होतां कामा नये. नियामक व्यवस्था अस्तित्वांत आली म्हणजे समाजाच्या अंग एका प्रकारचें दा येऊं लागतें. व जो जो ती व्यवस्था वाढतं जाईल तों तों तें दार्ध्यं अधिकाधिक प्रबल होत जाऊन, समाजांतील लवचिकपणा अगदीं नाहींसा होतो, व ज्या मानानें हा लवचिकपणा नाहींसा होत जातो त्या मानाने समाजाच्या पुढील सुधारणेस प्रतिबंध होतो.