पान:Aagarakar.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १२८
जिभा करून आमचा रंग काळा असला व तुमचा रंग गोरा असला म्हणून काय झालें ? रंगावर कांहीं मनुष्याची पात्रापात्रता ठरत नाहीं, वगैरे गोष्टी प्रतिपादूं लागले तथापि त्यांच्या शब्दास जोर येण्याचा संभव नाहीं, व त्याचा परिणामही होणें नाहीं. त्या शब्दांस जोर येऊन, इतरांनीं ते ऐकलेच पाहिजेत अशी खरोखर इच्छा असल्यास, ' ब्राह्मणोस्यमुखमासीत् ' हें पक्षपाती शास्त्र झुगारून देऊन, आपल्या मांडीला मांडी भिडवून शाळांतून बसण्यास महारांस मोकळीक दिली पाहिजे. पुरुषाची बायको मेल्यास त्यास जशी पुनर्विवाह करण्यास मोकळीक आहे, त्याप्रमाणे विधवांसही दुसरा रा करण्याची परवानगी पाहिजे. बायकांच्या केसांचा जर मेलेल्या नव- स्वाच्या गळ्यास फांस बसतो, तर पुरुषांच्या शेंडीचाही मेलेल्या स्त्रीस कां कांस बसूं नये ? व एकास जर कोणी संन्याशी करीत नाहीं तर दुसरीला मात्र न्हाव्यापुढें कां बसवावी ? पुरुषाला बायको आवडत नाहीं, येवढ्याच शुष्क कारणावरून वस्तुतः काडी मोडून देण्याचा त्यास जर अधिकार आहे, व तसें करून तो जर धर्मबाह्य होत नाहीं, तर एखाद्या स्त्रीला नवरा आव- डत नसल्यास, तिनेंही त्याला काडी मोडून दिली तर तिच्या नांवानें मात्र खडे कां फोडावेत ? अटकाव करणें असेल तर दोघांसही करा, नसेल तर दोघांसही मोकळीक द्या. महार आणि ब्राह्मण, विधवा आणि विधुर व स्त्री आणि पुरुष यांच्यामधील अन्यायमूलक व्यवहार बंद करणें आपल्या स्वतःच्या हात असून ते करण्याची ज्यांना नुसती वासनाही झाली नाहीं, अशा लोकांनी जिंकणारे व जिंकलेले यांच्यांतील भेद मोडून टाकण्याचा विचार मनांत तरी कशास आणावा ? व आणला तरी तो सिद्धीस कसा जावा ?
तात्पर्य, लोकांनी आपल्याशीं जसें वागावें असें आपणांस वाटतें, तसेंच आपणही दुसया वागण्यास तयार व्हावयाचें, त्यापासून हित असो वा अहित असो, त्याविषयीं विचार करीत बसावयाचे नाहीं खरें बोलल्यापासून नफा होवो, नुकसान होवो, परंतु तसें करणें हें आपले कर्तव्य होय, म्हणून जसें खरें बोलावयाचें किंवा नीतीनें वागलें असतां तोटा होईल अशी भीति असूनही जसें नित्याचरण सोडावयाचें नाहीं, तसेंच कोणतीही गोष्ट असो, रेखापासून न्याय होत आहे, किंवा ती करणें आपले कर्तव्य आहे, एवढ्या विचारावरच तिच्या मागें लागावयाचें, त्यापासून होणाऱ्या सुखदु:खाची