पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २२९ अनेक धनकोंनी कर्जाचे फेडीबद्दल एकाच वेळेस दावे केल्यास फेड होण्याचा अनुक्रम याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० ११ ) " ब्राह्मणाचें कर्ज देणें असेल तें प्रथम देववून नंतर राजाचें देववून बाकीच्या [ अनेक ] धनकोंचें देणें असेल तें कर्ज घेण्याचे काळाचे अनुक्रमानें देववावें. १४३५ विवादरत्नाकर ग्रंथांत कात्यायनवचन असें आहे: 46 एकाच वेळेस अनेकांचे कर्ज देणें असेल तेव्हां, राजाचें व श्रोत्रियांचे ( वेद जाणत्या ब्राह्मणाचें ) प्रथम देऊन नंतर [ बाकीच्या धनकोंस ] पहिल्यानें ज्याचें घेतलें त्यास पहिल्यानें [ अशा अनुक्रमानें ] द्यावें. परंतु एकाच दिवशी लिहून दिलेले दस्तऐवज असतील तेव्हां ( कर्जरोखे, करार वगैरे लेख एकाच मितीचे असल्यास ) कर्ज, फेड, बाकी आणि व्याज़ हीं एकसारखीं [व्हावयाचीं ]; इतर सर्व ठिका- णीं कर्जाच्या काळाचे अनुक्रमानें फेड करावयाची. आपणापासून घेतलेले कर्जानें अमुक वस्तु ऋणकोनें खरेंदी केली असें धनकोनें शात्रीत केलें तर मात्र त्यास कर्ज परत मिळण्याचा हक्क आहे, नाहीं तर नाहीं [असें समजलें पाहिजे ]. याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० ९३ ) " [ निरनिराळे केळीं ] ऋणकोनें परत दिलेल्या रकमा लेखाचे ( दस्तऐवजाचे ) पाठीवर ऋणकोनें लिहिल्या पाहिजेत; अथवा धनकोनें वसुलाबद्दल स्वदस्तुरच्या पावत्या दिल्या पाहिजेत. नारद ह्मणतो " कर्जाची फेड झाली ह्मणजे [ धनकोर्ने] भरपाईपत्रक दिले पाहिजे; तसें न केल्यास जाहीर रीतीनें भरपाई झाल्याचे कळविले पाहिजे. असें झालें ह्मजे ऋणकोची व धनकोची परस्परांची देवघेव राहिली नाहीं असें समजलें जाईल. ' प्रतिश्रवः ' सणजे भरपाई पत्रक, कर्ज पोंचलें अशा मजकुराचें. कर्ज न फेडल्यास ऋणकोस अनिष्ट फल होईल, याविषयीं कात्यायन सांगतो जो मनुष्य कर्ज वगैरे घेऊन नाहीं तो धनकोचे घरीं गुलाम, नोकर, [ धनकोची ] पशु, यांचे जन्मास जाईल. १४३८ १,४३७ 6 ૪૩૮ 59 " दास ' त्याची फेड धनकोस करणार बायको, किंवा ओझी वहाणारा उद्धारः ' ह्मणजे कर्ज. ' आदि ' ( वगैरे ) या शब्दाने न मागतां दिलेले कर्ज व अमानत ठेव यांचा समावेश करावयाचा. ( गुलाम ) ह्मणजे जन्मापासूनच जो गुलाम. 'भृत्य ' ( नोकर ) ह्मणजे किंमत देऊन विकत घेतलेला नोकर. नारद ह्मणतो " कर्ज किंवा देण्यास कबूल केलेलें [ द्रव्य वगैरे ] मागितल्यावरही ऋणकोनें दिलें नाहीं तर तें कर्ज वगैरे वाढतां वाढतां शंभर कोटपावेतों वाढेल. या मर्यादेपावेतों पोंचल्यावर मूळचा ऋणको अशा कर्माचे ४३५वी० प० १०५ पृ० १; क० वि०. 6 ४:३६ ‘बोपगतं' असा येथें पाठ आहे, परंतु 'चोपगतं' असाही पाठ आहे. (क) (य) (ङ) (छ). ४३७ वी० प० ११० पृ० १; व्य० मा० . ४३८ वी० प० १० पृ० २; व्य० मा० .