पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० याज्ञवल्क्यस्मृति. केली पाहिजे. त्याच्या पुत्रानें किंवा पौत्रानें, अशी शाबिती करून फळ नाही, कारण कीं, तशा स्थळीं भोगवट्यास विशेष वजन आहे. २८ ज्याचे हक्काविषयी तक्रार पडली आहे तो [ तशांत ] मेल्यास त्याचे वारसांनीं हक्काची शाबिती केली पाहिजे. अशा मुकदम्यांत हक्कांवांचून नुसत्या उपभोगाची शाबिती हे प्रमाण नव्हे. २९ [ न्यायाचे कार्यात ] राजानें नेमलेले जे अधिकारी 'पूग' संज्ञक, 'श्रेणी' संज्ञक, आणि 'कुल' संज्ञक, यांस पक्षकारांचा न्याय करण्याचे कामांत राजाने त्यांचें अनु- क्रमाप्रमाणें ( ह्मगजे उत्तरोक्तांपेक्षां पूर्वोक्तांचें बल अधिक समजावें.) ३० जुलमानें अथवा धमकीनें जीं कृत्य करविली असतील तीं रद्द करावी. तशींच स्त्रीनें केलेलीं, रात्रीं घडलेलीं, घरांत घडलेलीं, [ गांवाचे हद्दी ] बाहेर घडलेलीं, व शत्रूनीं केलेली कृत्यें; [ दारूचे वगैरे ] मदांत असतां केलेले, वेड्याने केलेले, रोगग्रस्त मनुष्यानें केलेले, संकटावस्थेत केलेले, वयांत नसलेले मागसाने केलेले, दहशत घातलेल्या माणसाने केलेले, तसेंच देशाचारविरुद्ध, जे ठराव, ते कायदेशीर होत नाहीत. तसेच कोणतेह अयोग्य कर्म [ करण्याबदलचा करार बेकायदा आहे. ] ३२ कोणाच्या नष्ट झालेल्या धनाचा शोध राजास लागल्यास [ खुणाखाणा योग्य रीतीनें पटवून घेऊन ] ज्याचें असेल त्यास परत द्यावें. [ मालक ] जर पुरावा न करूं शकेल, तर तो त्या धनाइतक्या दंडास पात्र होतो. ३३ पुरलेलें द्रव्य राजास सांपडल्यास त्यांतील अर्धे त्यानें ब्राह्मणांस द्यावें [ व बाकी अर्धे आपण ठेवावे ]. परंतु पुरलेलें द्रव्य विद्वान ब्राह्मणास सांपडल्यास त्यानें तें सर्व घ्यावें, कारण तो सर्वांचा प्रभु आहे. विद्वान् ब्राह्मणाहून इतर कोणत्याही मनुष्यास पुरलेले द्रव्य सांपडल्यास राजानें त्या द्रव्याचा सहावा हिस्सा [ त्याला] द्यावा. द्रव्य सांपडल्याबद्दल, ज्यास सांपडलें त्यानें राजास खबर न दिल्यास त्या पुरुषाकडून ते सर्व द्रव्य घेऊन [ शिवाय ] त्याच्या शक्ती- प्रमाणें दंडही घ्यावा. आपल्या देशांतील लोकांचें द्रव्य चोरांनी चोरून नेल्यास राजानें तें चोरांपासून घेऊन ज्यांचें त्यांस द्यावें. राजानें तें आपण घेतल्यास चोरांनी केलेल्या पातकांचा तो दोषी होतो. ३६ कर्जाची उगवणी. कर्जाबद्दल तारण [ धनकोचे ] स्वाधीन केले असल्यास [ मुदलाच्या ] ऐशीव्या