पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यवहाराध्याय. ३९ मुकदम्याचा निर्णय करावा, कारण कीं, दाव्यांतील मागणे खरें असूनही न्याया- धीशापुढें योग्य रीतीनें त्याचे स्वरूप करून दाखवितां न आल्यास आणि विरुद्ध पक्षा- कडून न्यायाचे कार्यात साधारणतः जी ठरीव वहिवाट आहे तितक्यापुरता पुरावा झाल्यास दावा नाशाबीत होण्याचा ( दावा बुडण्याचा ) संभव असतो. दाव्यांतील मागणीच्या रकमांपैकी अनेक रकमा [ प्रतिवादी ] आरंभी कबूल करीत नसून त्यांपैकीं कांहीं रकमा त्यावर परिणाम शाबीत होतील, तर त्याजकडून सर्व दावा राजाने देववावा. [ फिर्याद अर्जात ] जे मागणे [ वादीनें मागितलेलें नाहीं ] ते [ प्रतिवादीकडून ] त्यास देववूं नये. २० दोन स्मृति एकमेकांच्या विरुद्ध येतील तेथें प्राचीन काळापासून चालत आलेल्या न्यायास जी स्मृति अनुसरून असेल ती वरचढ समजावी. परंतु साधारण नियम असा आहे कीं, न्यायापेक्षां धर्मशास्त्राचा नियम बलवत्तर समजावयाचा. २१ लेख, भोगवटा, आणि साक्षी यांस पुरावा असे ठरविले आहे. यांपैकी कोणता- ही पुरावा नसल्यास त्याच्या मोबदला कोणचेंही एक योग्य असें दिव्य करण्याचें ठरविलेलें आहे. २२ पैशाबद्दलच्या सर्व प्रकारच्या दाव्यांत तक्रारीबद्दलचे पुराव्यास, ( प्रतिवा- दीचे पक्षास, जास्ती वजन, आणि गहाण तारण वगैरे ), देणगी, आणि विक्री यांचे दाव्यांत मुख्य दाव्याबद्दलचे पुराव्यास (वादीचे पुराव्यास ) विशेष वजन. २३ जो आपले जमिनीचा उपभोग, वीस वर्षांपावेतों, दुसन्यास आपल्याला माहित असूनही आपण कांहों तकरार न करितां, घेऊं देतो; अथवा आपल्या द्रव्याचा उपभोग दाहा वर्षांपावेतों दुसन्यास घेऊं देतो, त्या पुरुषास [ अशा जमिनीची किंवा द्रव्याची ] हानि सोसावी लागते. २४ तारण, सीमा, व नामरूप सांगून रक्षणाकरितां ठेवलेलं द्रव्य, वेड्या माणसाचें किंवा वयांत न आलेल्या मनुष्याचें द्रव्य, तशाच मोहोरबंद ठेवी, राजाचें द्रव्य, व स्त्रीचें किंवा वेदविद् ब्राह्मणाचें द्रव्य हीं शिवायकरून, २५ [ तंट्यांतील ] जीं तारणें वगैरे हक्क नसतां ज्या कोणी मनुष्याने दुसऱ्याचीं घेतलेलीं असतील वीं मालकास न्यायाधीशानें देववावीं; शिवाय तितकाच किंवा जितका देण्याचें सामर्थ्य असेल तितका दंड राजास देववावा. भोगवटा वंशपरंपरेचा नसल्यास त्यापेक्षां हक्काचें वजन ज्यास्ती. थोडाबहुत कालपावेतो तरी उपभोग झालेला नसल्यास कोणत्याही हक्कांत कांही एक जीव नाहीं, असे समजावें. २७ [ संपादिलेल्या हक्कांत ] तक्रार पडल्यास संपादणारानेंच त्या हक्काची शाविती