पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अगदों नवीन असल्यामुळे ग्रंथांत नमूद न करता आलेल्या उपयुक्त ठरावांत्रें टिपणः- दत्तकप्रकरण. विजापूर, धारवाड, जिल्ह्यांतील लिंगाईत लोकांत असलेल्या चालीच्या शाबिदीनें एकुलत्या मुलाचे दत्तविधान कायम झाले. दत्तविधानाच्या वेळेस घेणान्याने आपल्या मुलींना कांहीं स्थावर इप्टेट बक्षीस दिली व तो कागद व दत्तकपत्र एकाच वेळीं होऊन त्यांत परस्परांना उल्लेख होता, त्यामुळे बक्षसिपत्र कायदेशीर असून दत्तक मुलगा त्यानें बांधला गेला असा ठराव झाला. ह्याच ठरावांत दयामुष्यीयण सांप्रत होऊ शकतो किंवा नहीं ह्याबद्दल आधारांचा विचार झालेला आहे: बसव्या त्रि० लिंगमगौडा मुं. हा. को, छा. पी. उरात्र १८९४ पृ. २२० दायविभाग. परिच्छेद १. वारसा सुरू व्हावयाच्या वेळीं असलेल्या वारसांचाच सप्रतिबंध दायावर हक्क उत्पन्न होतो: नरसिंह वि० वीरभद्र इं० ला० रि० १७ म० २८७. विभाग होतांना कांहीं इटेट समाईक ठेविलेली असेल तर तिच्या संबंधानें विरुद्ध करार नसेल तर हक्क बदलत नाहीं, तशा इस्टेटीचे उत्पन्नत्र मागण्याचा दावा चालत नाहीं व अशी एकदा फिर्याद आगल्यावर मग तिला वांटपाच्या फिर्यादीचें स्वरूप देतां येत नाहीं: गौरीशंकर वि० आत्माराम इं. ला, रि. १८ मुं. ६११. एका भाऊबंदावर मिळविलेल्या हुकुमनाम्यानें विकलेली जमीन विकत घेणान्या- पासून विकत घेणारा इतर भाऊबंदांबरोबर समाईक भोगवट्याला पात्र होतो, मग जरी त्यानें त्यासाठी फिर्याद आणली त्या वेळीं ती त्यांच्या विरुद्ध मुदतीबाहेर गेली असली तरी हरकत नाहीं: कृष्णाजी वि० वि इं. ला. रि. १८ मुं. ५०५. वांटपाच्या फिर्यादीच्या वेळीं कांहीं इटेट अविभाज्य ह्मणून वगळलेली असेल तर तिच्या संबंधानें कुटुंब समाईकच राहतें. मल्लिकार्जुन वि० दुर्गाप्रसाद, इं. ला. रि. १७ म. ३६२. परिच्छेद २. अविभाज्य इंटेटीचा वारस कोण हे ठरवितांना कोणत्या वर्गातून एक निवडावयाचा तें अगोदर ठरलें पाहिजे. नंतर निवडणुकीसंबंधानें कांहीं कुलाचार आहे की काय तें पहा- चयाचें. असा नसेल तर वाडेलपणामुळे हक्क प्राप्त होतो. जवळचें नातें पुरत नाहीं. यास्तव मयताचे जर सख्खे अथवा सापत्न बंधु असतील, अथवा विरुद्ध निर्देश नसेल तेथें वडील असेल तोच वारस होतो: सुब्रह्मण्य वि० शिव ई. ला. रि. १७ म. ३१६. एखादी स्त्री वेश्येचा धंदा करूं लागली व पतित झाली झणजे तिचें माहेरचें नातें