पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ हिन्दुधर्मशास्त्र. मरणानंतर देखील त्यानें तिची तजवीज केली पाहिजे. मुलाने बापाची स्वकष्टार्जित मि ळकत वारशाने घेतली ह्मणजे हा नैतिक बोजा कायदेशीर होतो. ३४ ( ४०८.) योग्य कारणाशिवायही जरी आई मुलास सोडून गेली असेल तरी त्यानें अन्नंवस्त्राची नेमणूक तिला करून दिली पाहिजे. ३५ (४०८.अ ) दत्तक घेतलेल्या मुलानें घेणाऱ्या विधवेस पोसली पाहिजे. ( ४०९.) विधवेनें आपल्या मुलींबद्दल त्यांच्या विवाहाच्या वेळी पैसे घेतले असले तरी त्यामुळे तिच्या पोटगी मागण्याच्या हक्कास बाध येत नाहीं. ३६ अ ३७ ३७ ३८ ( ४१०.) जो पुरुष अपराधावांचून आपल्या गुणी स्त्रीस घरांतून घालवून देतो त्यानें तिला आपल्या दौलतीचा एक तृतीयांश दिला पाहिजे; आणि गरीब असल्यास तिचें पोषण तर केलेच पाहिजे. जर नवरा नेहेमा बायकोला इतक्या क्रूरतेने वागवील ह्म० तिच्या संरक्षणाची तिला फारच धास्ती पडेल तर तिला त्याचा आश्रय सोडून देऊन त्याच्या प्राप्तींतून निराळें अन्नवस्त्र मागण्याचा हक्क प्राप्त होईल. “ जी स्त्री नवऱ्याच्या परवानगीशिवाय, व योग्य कारणावांचून, त्यास सोडून आपल्या स्वतःच्या सग्यांजवळ जाऊन राहते तिला नवऱ्याजवळ अन्नवस्त्र मागण्याचा हक्क नाही. एखादा हिंदु, मुस- लमान झाला तरी त्यानें आपले हिंदु पत्नीस व मुलींस पोसले पाहिजे व त्याचा निर्दिष्ट जिंदगीवर बोजा ठेवावा. ३९ ४० (४११.) साधारणतः स्त्रीला नवऱ्याविरुद्ध पृथक् पोटगी मागण्याचा अधिकार नाहीं, परंतु जर ती नवरा अयोग्य रीतीनें वागतो किंवा शरिरास धोका वाटण्याजोगें आपल्यास वागवितो, असे किंवा अशीच दुसरी कारणे दाखवील तर तिला निराळी पोटगी मागण्याचा हक्क आहे. ४१ प्र० 19 (४१२.) जेथें नवयानें असें ठरविलें नसेल की, माझी विधवा माझ्या कुटुंबांत राहील तरच तिला अन्नवस्त्र द्यावें, तेथें जरी ती आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली ३४. जानकी वि. नंदराम इं. ला. रि. ११ अ. १९४. ३५. म. स. अ. चे रि. वा. १ पृ. १७०. ३६. जमनाबाई वि. रायचंद इं. ला. रि. ७ मुं. २२५. ३६.(अ) सन १८७८ चे मुं. हायकोर्टाचे छापी ठराव पा. २९२ पहा. ३७. व्य. म भा. २ पृ. २८४. तीन स्त्रिया असून दोहोंच्या मुलांस इस्टेट बक्षीस दिली तर तिसरीच्या अन्नवस्त्राचा बोज्या त्या इस्टेटीवर पडतो. नवरा हयात असतां कांहीही करार तिर्ने केलेला असला तर त्याने ती बांधली जात नाहीं. इ. ला. रि. ५ मुं. ९९. ३८. मतांगनीदासी वि. जगेंद्र इं. ला. रि. १९ क. ८४. ३९. सदर्लंड्स् वी. रि. वा. ६ पृ. ११५; स्पे. अ. नं. १२ स. १८६६; इं. ला. रि. व्हा. १ पा. १६४. ४०. मंचादेवी वि. जीवनमल इं. ला. रि. ६ अ. ६१७. ०१. शिलिंगाप्पा वि. शिदव्वा, इं. ला. रि. मुं. व्हा. २ पा. ६२४.