पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशास्त्र. प्र० ७ ( ३९८. ) जरी कोणी मनुष्यास मृत्युपत्र करण्याचा अधिकार असेल तरी तो त्यानें हिंदुधर्मशास्त्राप्रमाणें चालविला पाहिजे; ह्मणून जी व्यवस्था करणें ती विध- वेच्या अन्नवस्त्राची सोय करून मग बाकीच्यांची करावी, असा प्रिव्ही कौन्सिलाने ठराव केला आहे.' १९ २२६ ( ३९९.) कांहीं वेळपर्यंत कांहीं थोडे रुपये एक हिंदु विधवा घेत होती ह्म- णून आपल्या नवऱ्याच्या इस्टेटीच्या उत्पन्नाप्रमाणे योग्य अन्नवस्त्र मागण्याचा तिचा अ धिकार जात नाहीं. २० ( ४००. ) एका हिंदूनें आपल्या इस्टेटीचें मृत्युपत्र करून ती आपल्या पुत्रांस दिली. नंतर त्यांनी त्याप्रमाणें वांटणी करून घेतली. त्या वांटणीनंतरही मयताच्या विधवेला अन्नवस्त्र देण्याचा ठराव करून, तें सर्व हिस्सेदारांनी आपआपल्या हिश्शाप्र- माणे द्यावें असा ठराव झाला. २३ २२ २३ ( ४०१.) प्रतिवादीजवळ अन्नवस्त्र देण्याजोगें इस्टेट नसेल तर तें देण्याचा ठराव कोर्ट करित नाहीं. उदाहरणार्थ, सासज्यापाशी वडिलार्जित इस्टेट नसेल तर सु- • नेचा व तिच्या पोषणाचा कायदेशीर बोजा त्याच्यावर नाहीं. 23 फक्त स्त्रीधन व भाडें उत्पन्न करणारेंच घर जवळ असेल तर विधवा सुनेवर विधवा सासूस पोसण्याचा बोजा नाहीं. त्या घरांत तिचा राहण्याचा मात्र अधिकार आहे. तलेंच ज्या इस्टेटींतून अन्नवस्त्र द्यावयाचें आहे ती प्रतिवादीच्या कबजांत आहे असे शाबीत झाल्याशिवाय कोर्ट अन्न वस्त्र देवविणार नाहीं. २४ २५ २६ ( ४०२. ) वंशपरंपरेची किंवा नवऱ्याची स्वार्जित इस्टेट असल्यास मात्र तींतून विधवेस निराळें अन्नवस्त्र मिळण्याचा हक्क आहे. परंतु एकत्र हिंदु कुटुंबाची जर वडि- लार्जित कांही मिळकत नसेल तर त्यांतील एकाची विधवा जेथपर्यंत इतरांच्या १९. मूर्स इं. अपीलस् वा. ८ पृ. ६६. २०. कलकत्ता स. दि. अ. चे रि. स. १८५० पृ. ४२२. २१. फुल्टनकृत कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टाचे रि. वा. १ पृ. १७९ ता० ३० मार्च सन १८४३. २२. म. स. अ. चे रि. सन १८५७ पृ. ८२. २३. काळू वि. काशीबाई इ. ला. रि. ७ मुं. १२७. २४. बाई कंकू वि. बाई जाधव इं. ला. रि. ८ मुं. १५. २५. म. स. अ. चे रि. सन १८५९ पृ. २६५. २६. म. स. अ. चे रि. सन १८५९ पृ. २७२. याप्रमाणे इस्टेटींतून मुंबईचा स. दि. अ. चा हो. अ. नं० ३०९० यांत देवविण्याचा ठराव केला: मारिसचे रि. वा. १ पृ १६२; व तसाच उपा, ध्यिकपणाच्या वतनांतून अन्नवस्त्र देवविण्याचा ठराव अ. नं० ३२२२ यांत झाला आहे. मारिसचे रि- वा. १ पृ ८५ ); ला. रि. इं. अ. व्हा. ६ पा. ११४.