पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र०४ सापिण्ड्यनिर्णय. १२९ वचनानें आहे. १७ चवथी पितामही 'तिचा अधिकार मनुवचनोक्त" आहे. पितामहीचें ग्रहण मनूने केलें तेव्हां तिच्या समान वरील तीन प्रपितामही आदिकरून स्त्रिया यांचें ग्रहण विज्ञानेश्वरानें केलें. फक्त प्रपितामहीचें नांव घेऊन असेंच सातव्या पिढी- पर्यन्त समजावें असें विज्ञानेश्वराने मोघम सांगितलें तेंच व्यक्त मागील उताऱ्यांत विश्वेश्वरानें केलें. ( १४९.) या स्त्रियांनाही दायग्रहणाचा अधिकार आहे तो पुरुषवारसांप्रमाणें निष्प्रतिबन्ध नाहीं यावरूनही तो त्यांचा अधिकार ऋषिवचनांच्या बलावर लोक मानूं लागले असें दिसतें." जेवढ्या नामनिर्दिष्ट आहेत त्यांशिवाय सर्व अन्य अन- धिकारी असें बंगाल्याकडे व मद्रास इलाख्यांत निर्विवाद आहे, व विज्ञानेश्वरानें असें स्पष्ट सांगितलें नाहीं तरी त्याचा आशय मला तसा दिसतो. मुंबई इलाख्यांत निराळें शास्त्र आहे अशीं मे० वेस्ट आणि बुलर यांच्या ग्रन्थांत नऊ उदाहरणे दिलेली आहेत, परंतु कज्जांतील हकीगत व मुद्दे, व त्यासंबंधों प्रश्न, व शास्त्री लोकांची उत्तरें हीं साग्र दिलेली नसल्यामुळे ती बरोबर समजत नाहींत. ३० मी हाच प्रश्न कैलासवासी प्रख्यात काशीस्थ पण्डित बालशास्त्री रानडे यांस विचारिला होता व त्यांनी मिताक्षरेचा आशय. मी वर लिहिल्याप्रमाणेच आहे असें कळविले आहे. 39 ( १५०.) आतां गोत्रजांत वारशाचा क्रम कित्येकांचा पूर्वी सांगितला आहे. येथे समानोदक वारसांर्पयतचा समग्र कोष्टकरूपानें देतों. २७. व्य० लो० १३५. २८. अ० ९ श्लो० २१७. २९. विधवा साध्वी असेल तर मात्र तिला दाय मिळतो ( पहा० मा० २ पृ० १९० ). तिने दत्तक घेतांच तिचा अधिकार नष्ट होतो हे मार्गे सांगितले आहे. तिर्णे दुसरा विवाह केला असतां तिचा अधिकार जातो हैं मार्गे विवाहप्रकरणांत सांगितले आहेच. मुलींत निर्धनेला अधिकार पूर्वी आहे हें पुढें सांगितले आहे. आईचा इक विधवेप्रमाणे बऱ्याच अंशी आहे हे पुढे सांगितले आहे. ३०. त्या प्रत्येक उदाहरणाविषयी माझा अभिप्राय आमच्या इंग्रजी ग्रन्थांत पा० ३७२-३७६ येथें पहा, व मेन करुम ४८८ आवृत्ति ५ पहा. ३१. त्यांचा जबाब संस्कृतभाषेत आला आहे. तो असां:-" तस्मात्पितुर्मातेत्यस्य प्रपितामह्माय पलक्षणत्वेन सप्तमपुरुषपत्नीपर्यन्तानां धनाधिकारस्य सिद्धत्वेऽपि स्नुषाभ्रातृपल्यादीनां प्रतिपदमनुक्तान नकथमप्यधिकार इति मिताक्षरावीरमित्रोदययोः सिद्धान्तः ।