पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्म शास्त्र. प्र० ३ (१२० क.) घेणाऱ्याचे स्वातंत्र्य राहतें. जो मनुष्य मोबदला देऊन खरेदीदार होतो, त्याच्याइतक्या अधिकाराचा दत्तक पुत्र हा नसून औरस पुत्राच्या बरोबरीचा आहे, ह्मणून दत्तक घेतल्यानंतरही बाप स्वार्जिताचा यथेच्छ विनियोग करूं शकतो. ( पुरुषोत्तम वि. वासुदेव मुं. हा. रि. व्हा. ८ (अव्व. शा. ) पा. १९६). दुसऱ्या एका कज्यांत असे आढळले की, एक बक्षिसपत्र विवादांत असतां, बक्षिस पत्र देणाराने दत्तक मुलगा घेतला. ठराव झाला की, त्या दत्तक मुलास पहिल्या दाव्यांत पक्षकार केले नसेल तर त्याला बक्षिसपत्राबद्दल पुनः विवाद करण्याचा अधिकार आहे. दावा चालत असतां, दाव्यांतील मिळकतीच्या विक्रीचा न्याय, दावा चालत असतां झालेल्या दत्तविधानास लागत नाहीं ( रामभट वि० लक्ष्मण इं. ला. रि. मु. व्हा. ६ पा. ६३० ). मिळावा ह्मणून एका विधवेनें नवन्याचा समाईक मिळकतींतील हिस्सा दावा आणिला व निकाल होण्यापूर्वी मुलगा दत्तक घेतला. तो दावा हिंदुस्थानांतील को- टांनी देवविला. ठराव झाला की, दत्तविधानानंतर आईचे मिळकतींत स्वत्व कांही राहिलें नाही ह्मणून आई दावा चालविण्यास योग्य पक्षकार नव्हती; तथापि खालील कोर्टात ही हरकत घेतली नाहीं तेव्हां तिर्णे मिळावेलेला हुकुमनामा मुलाच्या वतीचाच असा समजावा ( धर्मदास पांडे वि. मसामन शामासुंदरी देवी मू० इं. अ. व्हा. ३ पा. २२९; वी. रि. व्हा. ६. प्रि. कौ. पा. ४३ ). १०८ (१२० ड.) कोणी एकानें आपली सर्व जिनगी बक्षीस दिली, आणि ती बक्षीस घेणाऱ्याच्या वहिवाटीस दिली. नंतर आपण मुलगा दत्तक घेतला. अर्मे झाले असतां, सद देणगी रद्द होत नाहीं अर्से ठरवून दत्तक मुलांचा दावा मुंबईच्या हायकोर्टानें रद्द केला. हा ठराव दुसरें अपील ४१२ सन १८७९, फडशा ता. ५ जुलई १८८१ यांत झाला. त्यांतील बक्षिसपत्राची नक्कल वाचकांच्या माहितीकरितां उतरून घेतली आहे ती :- -- श्रीगजानन. बक्षीसपत्र शके १७७८ नळनाम संवत्सरे भाद्रपद शुद्ध ११ सोमवार तारीख १० माहे सपटंबर सन १८९६ ते दिवशीं लिखीते वेदमूर्ति राजश्री मोरभट्ट विन रामकृष्णभट्ट निजसुरे उपाध्ये कसबे अंजलै तर्फ केळशी तालुके सुवर्णदुर्ग यांसी बक्षीस देणार चिंतो लक्ष्मण मायले रहाणार कसबा अंजले तर्फ केळशी तालुके मजकूर बक्षीसपत्र लिहून देतों ऐसाजे. माझा वृद्धापकाळ जाहला. माझे पार्टी पुत्रसंतान नाहीं. तुझी सत्पात्र ब्राह्मण आणि आमचें गुरुस्थान व आजपर्यंत तुमचे वडिलांनीं व तुझी माझा प्रतिपाळ केलात. माझे पोटीं पुत्रसंतान नाहीं सबच धर्मरूप बक्षीस कसचे मजकूरी माझे इमले वगैरेजी जिनगी आहे त्यासुद्धां दिलें.