पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देसंकप्रकरण. दत्तक छून, ती फक्तं आपल्या कुटुंबांच्या योग्यतेप्रमाणे अन्नवस्त्राची मात्र मालक होते. झाल्यावर जर पुढें औरस पुत्र झाला, तर दत्तकास औरसाचा चतुर्थांश मिळतो. १४२ मुंबई हायकोर्ट बापाच्या इष्टेटीचा पंचमांश मिळतो असे ह्मणतें.४३ हा नियम मिताक्षरा व मयूव प्रांतांत सारखा आहे. परंतु जैन लोकांतील एका कज्यांत ह्याच कोर्टानें एक चतुर्थांश मिळतो असे ठरविले आहे. १४४ दत्तकाच्या जनक पित्यास पुत्र, पत्नी आदिकरून नसली, तर दत्त- कानें त्याचं रिक्थ घेऊन पिण्ड द्यावा, असे मिताक्षरेच्या बाळंभट्टकृत टीकेंत शातातप स्मृतीच्या आधाराने लिहिलेले आहे. परंतु तो लेख विशेष मजबूद दिसत नाहीं. दत्तकाचा संबंध जरी जनकं पित्याच्या कुटुंबार्शी वं दायाशीं तुटतो, तरी त्या कुटुं- बाशी त्याचा शरीरसंबंध होत नाहीं. १४५ ( ११५.) आपल्या बायकोच्या भावास दत्तक घेतां येतो. मावशीच्या मुलीचा मुलगा दत्तक घेतां येतो. १४० विधवेला आपल्या भावाचा मुलगा घेतां येतो. १४८ ( ११६. ) ज्याचें दत्तविधान अशास्त्र झाले असे ठरलें, त्यास दत्तक घेणाऱ्याच्या कुटुंबांतून अन्नवस्त्र मिळावें, अर्से पूर्वी मत होते; परंतु अशाचा हक्क घेणाऱ्याच्या इष्टेटीवर चालणार नाहीं, आणि अशाचे मूळचे हक्क दत्तविधान बेकायदा ठरल्यामुळे कायम राहतात असा अलीकडे ठराव झाला आहे. १४९ ( ११७.) स्पे० अ० नं० २४२० यांत मुंबईच्या सदर दिवाणी अदालतीनें असा ठराव केला आहे कीं, ज्या विधीनें दत्तविधान व्हावयाचें त्या विधीनें पूर्ण झाले असतां तसे दत्तविधान करण्यामध्यें जरी देणारानें व घेणारानें पाप केले असेल, तरी तें दत्तविधान रद्द होणार नाहीं. ह्यासंबंधानें आतां गंगासाह्रै वि० लेखराजसिंह, इं. ला. रि. ९ अ. २५३ ह्यांतील चर्चा पहावी. १५० १०५ ( ११८.) जैन लोकांच्या शास्त्राप्रमाणें दत्तक घेणें तो बत्तीस वर्षेपर्यंत उमरीचा ध्यावा असा एके ठिकाणों ठराव झाला आहे.' १५१ १४२. वीरमित्रोदय, प० १९०, पुं २, पंक्ति ५, व्यवहारमयूख भाषान्तर, को. रि. चा० १ पृ० ४५. पाचप्रमाणे मिताक्षरा ब दत्तकमीमांसा यांचे मत आहे. १४३. गिरिआवा वि० निंगप्पा इं० ला० रि० १७ मुं० १००. १४४. रुखाब वि० चुणीलाल अंबुशेट इं० ला० रि० १६ मुं० ३४७. १४५. संस्कारकौस्तुभ, प० ४९, पृ० १, पंक्ति ४. १४६. बाराडेलचे रि० वा० २ पृ० ६६३. श्रीरमल वि० रामय्या इं० का० रि० ३ म १५. १४७. वैकट वि० सुभद्रा इं० ला० रि० ७ म० ५४८. १४८. गिरिआप्पा वि० १४९. मद्रास हा० को० १५०. मारिसचे रि० वा० ४ पृ० २६. १५१. मालिंज् डैजेस्ट वा० १ पृ० २३क० ९३. १४ भिमप्पा इं० ला० रि० ९ मुं० ५८. रि० वा० १ पृ० ३६३ स्पे० अ० नं०३८ स० १८६३, ३४; मद्रास हा.