पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५५

सारखे होत नाहीं. समुद्रादि जलसमूहाचे, तसेच डोंगराचे सान्निध्यामुळेही हालचाल कमीजास्त होते; व त्यामुळे लहानमोठे वारे उत्पन्न होतात. परंतु ह्या स्थानिक वाऱ्यांंबद्दल आपणांस विचार कर्तव्य नाहीं. मुख्य मुख्य सार्वत्रिक वारे व त्यांतही ज्यांचा हिंदुस्तानाशी संबंध आहे त्यांचाच विचार करावयाचा आहे. असे वारे तीन प्रकारचे आहेतः १ वसंतऋतूंतले वारे. २ नैर्ऋत्येकडील नियतकालिक वारे. व ३ ईशान्येकडील नियतकालिक वारे. ह्यांचे आतां अनुक्रमें वर्णन करूं.

 वसंतऋतूतले वारे:-हे वारे म्हणजे एप्रिल व मे ह्या महिन्यांमध्ये जमीन व समुद्र यांवरून सुटणारे वारे होत; यांस मतलई व खारा वारा असे म्हणतात. ह्या वाऱ्यांंचा संबंध विशेषतः दक्षिणचे द्वीपकल्पाशी आहे. पाण्याचे अंगीं असा एक धर्म आहे की, तें लौकर तापत नाहीं, व एकदां तापलें म्हणजे लौकर निवतही नाहीं. सूर्योदय झाला म्हणजे जमीन भराभर तापू लागते व तिजवरील हवा गरम होऊन वर जाऊ लागते; व तिची रिकामी झालेली जागा समुद्रावरील थंड हवा भरून काढू लागते, ह्यामुळे समुद्राकडील वारा सुरू होतो. ही क्रिया तिसरा प्रहरपर्यंत चालते, नंतर जमीन भराभर थंड होऊ लागते, व तिजवरील थंड झालेली हवा समुद्राकडे जाऊ लागते; ह्यामुळे जमिनीवरील वारे सुरू होतात. ते सर्व रात्रभर चालू असतात.

 हे वारे वसंतऋतूंतील पाऊस आणणारे होत. उन्हाळा असल्याकारणाने समुद्राचे पाण्याची वाफ विशेष होऊन हवेत मिस-