पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५४

सारख्याच आकारमानाचे घेतले तर फुगलेला पदार्थ मूळ पदार्थापेक्षां हलका असलाच पाहिजे. वातावरणांतील हवेस ज्या ठिकाणी उष्णता लागते, तेथे ती फुगते; म्हणजे सभोवतालचे हवेपेक्षा पातळ व हलकी होते. पाण्याचे तळाशीं बूच ठेविलें, तर ते जसे आपोआप वर येते त्याप्रमाणे ही हलकी हवा आपोआप वर जाऊं लागते; व तिची रिकामी झालेली जागा सभोंवतालची थंड अर्थात् जड असलेली हवा भरून काढू लागते, ह्यामुळे हवेस गति उत्पन्न होते; व ह्या गतियुक्त हवेस वारा म्हणतात.

 जाड कागदाचा एक वर्तुलाकार तुकडा घेऊन तो सर्पाकृति कातरावा, व त्याचे मध्य एका सुईच्या अग्रावर ठेवावे म्हणजे तो बाजूस लिहिलेल्या आकृतींत दाखविल्याप्रमाणे दिसेल.

हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf

ह्याच्या खालीं एक जळती मेणबत्ती ठेवावी. मेणबत्तीच्या उष्णतेने हवा पातळ होऊन वर जाऊं लागेल व तिचा आघात कागदावर होऊन कागद गरगर फिरूं लागेल. अशीच क्रिया पृथ्वीवर मोठ्या प्रमाणाने चालत असते.

 पृथ्वीवर निरनिराळ्या वेळी निरनिराळे ऋतु होत असल्याकारणाने, उष्णतेचे मान निरनिराळ्या ठिकाणी कमी जास्त होते व त्यामुळे वाऱ्याची उत्पत्ति होते. हे उष्णतेचे कार्य हवेवर सर्वत्र