पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२६

पाहिले तर धान्याचा दुष्काळ पडलेला बरा, परंतु पाण्याचा दुष्काळ नको. गाड्या, आगगाड्या, आगबोटी वगैरे वाहनांच्या साधनाने धान्य इतर ठिकाणांहून आणण्यासारखे असते; परंतु पाणी तसे आणतां येण्याची मुष्कील आहे.

 ह्याप्रमाणे मनुष्यें व गुरे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात इतकेच नव्हे, परंतु ह्या सांठलेल्या पाण्यावर शेतकीही पुष्कळ अंशीं अवलंबून असते. सकृद्दर्शनीं असे वाटते की, बागाईत जमिनीस पावसाची अवश्यकता नाहीं; ह्यांस नद्या, नाले, तलाव आणि विहिरी ह्यांचे पाट व कालवे ह्यांपासून पुरेसे पाणी मिळाले म्हणजे झाले. परंतु जिराईत जमिनीच्या मानाने पाहिले असतां बागाईत जमीन प्रथमतः अगदी थोडी आहे. आतां, दुष्काळाचे प्रसंगी अशा जमिनीपासून थोडाबहुत तरी धान्याचा पुरवठा होतो ही गोष्ट निराळी. पण विहिरीनाल्यांसच जर पाणी पुरेसे नाही तर बागाईत तरी होणार कोठून ! आपल्या दयाळू सरकाराने हल्ली कांहीं प्रांतांमधून मोठमोठे कालवे काढलेले आहेत, व आणखी काढण्याचे काम सुरू आहे. माजी अमलांतही अशा प्रकारचे कालवे काढलेले आहेत, व त्यांपासून हजारों एकर जमीन भिजत आहे. कांहीं कांहीं ठिकाणी तर दुष्काळ पडण्याची भीति सुद्धा उरली नाही ही गोष्ट खरी; परंतु मूलतः ज्या नद्यांपासून हे कालवे काढलेले आहेत त्यांसच जर पाण्याचा पुरवठा चांगला न झाला