पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५

दिशेकडे उन्हाळा फारच कडक भासतो. सिंधप्रांतामध्ये बलुचिस्तानचे सरहद्दीवर तर उष्णतेची कमाल होते. जेकबाबाद एथें पारा कधीं कधीं १२५° वर चढतो. इतकी उष्णता हिंदुस्तानांत दुसरे कोठेही नसते. पंजाब ह्याचे खालोखालच असतो. ह्या भागांत जून महिन्यामध्ये भयंकर भट्टी पेटते असे म्हणण्याचा प्रघात आहे. उत्तर हिंदुस्तानांत हिंवाळ्यामध्ये थंडी फार पडते म्हणून हा ऋतु तेथे स्पष्टपणे निराळा भासतो.

 मध्य हिंदुस्तानांत उन्हाळ्यामध्ये उष्णता थोडीशी कमी भासते. हा भाग जरी कर्कवृत्ताजवळ आहे, तरी डोंगराळ असल्याकारणाने उष्णता इतकी भासत नाही. परंतु, थंडीच्या दिवसांत थंडी बरीच असते.

 दक्षिण जरी उष्ण कटिबंधांत आहे, तरी एथे उन्हाळा सौम्य असतो. ह्याची कारणे तीन आहेत. पहिले कारण हें कीं, हा प्रदेश एक विस्तीर्ण पठार असल्या कारणाने म्हणजे समुद्राचे पृष्ठभागापासून हा बराच उंच असल्या कारणाने एथे सूर्याचे किरण फारसे प्रखर नसतात. दुसरी गोष्ट अशी की, मे व जून ह्या महिन्यांमध्ये सूर्य कर्कवृत्ताचे जवळ जवळ असल्यामुळे त्याचे किरण फारसे लंब रेषेने पडत नाहींत. व तिसरी गोष्ट, जून महिन्याचे आरंभींच पाऊस सुरू झाल्या कारणाने एथे थंडावा उत्पन्न होतो. तथापि, हिंवाळाही सौम्यच असल्या कारणानें वार्षिक उष्णतेचे सरासरी मान मात्र जास्त असते.

 एकंदरीने पाहतां, डोंगराळ प्रदेशाचा थोडासा भाग खेरीजक-