पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२०

देशाचा थोडासा भाग खेरीजकरून बाकी सर्वत्र ओलाव्याचीही उणीव नाहीं.

 वरील दोन गोष्टींशिवाय झाडांचे उत्पत्तीस व वृद्धीस आणखीही एका गोष्टीची अवश्यकता आहे. ती जमिनीचे पृष्ठभागावरील कमी अगर अधिक माती ही होय. परंतु हवा, पाऊस वगैरेच्या आघाताने पृथ्वीचा पृष्ठभाग कुजून त्याची स्वभावतःच नेहमी माती बनत असते. ह्याकरितां ह्या अवश्यकतेची उणीव फारशी कोठेही नसावयाची.

 ह्याप्रमाणे झाडांचे उत्पत्तीस व वृद्धीस बहुतेक सर्व देशभर आनुकूल्य असल्याकारणाने वर निर्दिष्ट केलेल्या काळीं सर्व देश झाडझाडोऱ्याने व्याप्त असला पाहिजे, असे अनुमान काढण्यास कांहीं हरकत नाही. आतां, एवढी गोष्ट खरी की, ज्या ज्या स्थळी हें अनुकूल्य कमीअधिक असेल त्या मानाने समृद्ध कमीजास्त असणार.

वेदकाल.

 वर सांगितलेल्या कालानंतर देशामध्ये प्रथमतः जेव्हां मनुष्य- वस्ती झाली असेल, तेव्हां तीं मनुष्यें राक्षसादि रानटी मनुष्य असली पाहिजेत. अशा मनुष्यांकडून रानांचा नाश होत नाही. धान्य पिकविण्याची कला ह्या लोकांस अवगत नसली पाहिजे. व जरी थोडीबहुत माहीत असली, तरी ती हल्लींच्या दळऱ्ही वगैरे लागवडीच्या नमुन्याची स्थलांतर करणारी असली पाहिजे. अशा लागवडीने रानांचा कायमचा नाश होत नाहीं. लागवडीकरितां