पान:हिंन्दू सम्राट्.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपेोद्घात.

(૭)

चंद्रवंशांतील 'भरत' आणि 'युधिष्टिर' इत्यादि अनेक राजांच्या पराक्रमांचीं, त्यांच्या राज्यपद्धतीचीं आणि प्राचीन देशस्थितीचीं वर्णनें लिहिलेलीं आहेत.  परन्तु कालाच्या प्राचीनत्वामुळे त्यांमध्ये अस्पष्टता येणेंही अपरिहार्य आहे. म्हणून ज्या ग्रंथांतील ऐतिहासिक वर्णनें इतर देशांतील प्रवासी, राजे आणि राजदूत ह्यांनी आमच्याविषयी लिहिलेल्या माहितीशीं ताडून पाहतां येतात, असे आमच्या हिंदु विद्वानांचे प्राचीन ग्रंथ आणि त्यांतील ऐतिहासिक विषय हाच विश्वसनीय व बहुतांशीं निर्विवाद समजला जातो. अशा प्रकारच्या सुमारें दोन-अडीच हजार वर्षांच्या कालविभागांतील गणनीय अशा थोर हिंदु सम्राटांचीं चरित्रं प्रस्तुत पुस्तकामध्ये मी देत आहे. हीं दहा चरित्रे केवळ चरित्रांच्या पद्धतीने दिलेलीं नसून, तीं दहा प्रमुख केंद्रे कल्पून ओघाओघाने वेळोवेळीं झालेल्या अनेक घडामोडींचें आणि आंदोलनांचें थोडक्यांत वर्णनच आहे, हें वाचकांच्या ध्यानांत येईलच.