पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

EEEEEEEEE (११६ ) = सुरू असलेल्या लढाईत आपण मध्यस्ती करून ती लढाई - मिटविण्याची काही तरी लौकर तजवीज करावी. त्यावर त्या शहाण्या मुत्सद्याने असे उत्तर दिले की, ही लढाई नुकतीच सुरू होऊन दोन्ही पक्ष मोठ्या आवेशाने परस्परांशी फार जोराने लढताहेत. अशा वेळी मध्यस्तीचा काही उपयोग होणार नाही. यास्तव लढाई करतां करतां ते कांहीं कालाने थकून जेरीस आले झणजे आपोआप नरम पडतील. तशा वेळी त्यांजवर केलेल्या बोधाचा काही उपयोग होईल, तशी वेळ येई तोपर्यंत कोणी काही न बोलतां स्वस्थ बसावे हेच योग्य आहे. ह्या तत्वाचा आमचे पोक्त व अनुभवी पिढीजाद वैद्यलोक अनेक ठिकाणी उपयोग करतात. एखाद्या मनुष्याची प्रकृति बिघडून त्यास मोठ्या जोराने ज्वर येऊ लागला, तर चांगले वैद्य त्यांस तत्काळ औषध सुरू करीत नाहीत. ते असे सांगतात की, पहिल्या उमेदीच्या जोरांत ज्वर आहे तोपर्यंत औषध दिले तर तो त्याला न जुमानतां अधिक चवताळेल. ह्मणून काही दिवस त्याला औषध न देतां आपोआप नरम पडू द्यावा; तो नरम पडल्यावर दिलेल्या औषधाने रोग्यास लौकर गुण येईल. आमच्या घरांतील स्वयंपाक करणाऱ्या बायका देखील ह्या तत्वाचा उपयोग नित्य करीत असतात. पहा, भाकरीचे पीठ भिजविल्याबरोबर त्याच्या भाकरी थापीत नाहीत. कारण तशा कच्चेपणाने तें वठणीस न येतां त्याच्या भाकरी थापल्यास जागोजाग भेगा पडून भाकरी तडकते, ह्मणून आधणाच्या पाण्याने पीठ भिजवितात. किंवा ओल्या पिठास अगोदर खूप जोराने मळतात. अशा उपचारांनीं तें वठणीस येऊन नरम झाले झणजे त्याच्या