पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११५ ) लागेल हे कळत नाही. एकाने केलेल्या दुष्कृत्यांची फळें जातीच्या सगळ्या लोकांस फार दिवस भोगावी लागतात, ह्मणून असल्या आडमार्गात सहसा कोणीही शिरूं नये हेच उत्तम होय. पुण्यांत हिंदु व मुसलमानांचे तंटे सुरू होऊन सहा महिने झाले. इतक्या कालांत तीनवेळ कटकटी झाल्या त्याबद्दल तंटेखोरांस थोडे फार प्रायश्चित्त मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत पहिला जोराचा आवेश होता तो मुरून आतां बराच मऊपणा आला असावा. कारण एकदां आंगावरून जोराने इंगा फिरला ह्मणजे सर्पासारखे दीर्घ द्वेषी प्राणी देखील नरम होतात. मग मनुष्यासारखे शहाणे प्राणी नरम झाले तर आश्चर्य काय ? रागाचा पहिला झटका निघून गेल्या कारणाने व पोलिसाने व न्यायाधिशांनी दंगेखोरांची कणीक बरीच मऊ केल्यामुळे त्यांस आतां थोडीबहुत उपरतीही झाली असेल. अशा प्रसंगी त्यांजला तिन्हाईत लोकांनी सुबोध करून वाटेवर आणण्याचे प्रयोग केल्यास ते चांगले लागू पडतील अशी आशा आहे. सन १८७७-७८ सालीं तुर्क व रशियन लोकांची लढाई जुंपून परस्परांकडील पुष्कळ सैन्याचा फन्ना उडूं लागला. हे मनुष्यघातक कृत्य पाहून बहुत लोकांस दया आली. सन १८७० च्या लढाईत जर्मनीने फ्रान्साचा पराभव करून फ्रान्साकडील युरोपांतील राजकीय श्रेष्ठत्व जर्मनीच्या बादशहाने हिरावून आपलेकडे घेतले. त्यावेळी जर्मनीचे मुख्य प्रधान प्रिन्स बिस्मार्क होते. हे साहेब मोठे राजकारस्थानी व सगळ्या युरोपांत पहिल्या नंबरचे नावाजलेले शहाणे होते. त्यांस इतर देशच्या कित्येक वकिलांनी विनंती केली की, तुर्क व रशियन लोकांत