पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ११२ ) काम करण्याचे वळण, व्यवहारांत सभ्यपणाने व नोकीझोंकीने वागण्याची ढब, पुण्याचे लोक स्वभावतः धीट, प्रसन्नमुख, चतुर, समयसूचक व कर्तृत्वाने आपलें तेज दुसऱ्यावर पाडणारे असे आहेत. असल्या गुणिजन सूज्ञ हिंदु व मुसलमानांची जेथे मोठी वस्ती आहे, अशा सुखवस्तु लोकांच्या वस्तीवर कोणातरी दुष्टाची दृष्ट पडली असावी, ह्मणूनच हिंदु व मुसलमानांत तंटे सुरू झाले यांत संशय नाही. कोणी करील तर याला उपाय अगदी सोपा आहे. पहा सुस्वरूप, गोऱ्यागोमट्या व गुण दाखविणाऱ्या अशा मुलांस दृष्ट फार लौकर बाधते तेव्हा त्यांच्या माता मोठ्या भक्तीने अशा दृष्टावलेल्या मुलांवरून मीठ, मोहऱ्या व मिरच्या ओवाळून काढून त्यांचा चुलीतल्या अग्नीवर होम देतात, ह्मणजे दृष्ट उतरते. कधी कधी रस्त्यांत चालतांना मुलांस दृष्ट लागल्याचा आयांस भास होतो. तेव्हा आपल्याच तळपायाची माती बोटाने घेऊन ती मुलाचे कपाळास लावितात. त्याचप्रमाणे कपाळावर काजळाची तीट, व डाव्या गालावर काजळाचें गालबोटही लावितात. तेणेकरून मुलांवर दुष्ट लोकांची नजर फिरली तरी दृष्टीची बाधा होत नाही. ह्याच समजुतीने नवरदेवाच्या डोळ्यांस काजळ व काजळाची गालबोट लावण्याची चाल आपणांत सर्वत्र ठिकाणी चालू आहे. एखाद्या मातेस दया येऊन पुत्रवात्सल्याने पुण्याच्या लोकांची कोणी लौकर दृष्ट काढील तर हटकून गुण येईल असा भरंवसा आहे. काम अगदी सोपे आहे. पण तें मनांत विकल्प न आणतां खऱ्या भक्तिभावाने केले पाहिजे, तरच गुण खास येईल. हा वरोपचाराचा तोडगा आहे, योग्यवाटल्यास एखा