पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

an (१११ ) पून उत्तम प्रकारे चालविले आहे. मुंबई इलाख्यांतील सर्व विद्यालयांत न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज ह्या संस्था पहिल्या प्रतीच्या गणिल्या जात आहेत. हे कॉलेज स्थापन होऊ लागले तेव्हां नेटिवांस कसे चालवितां येईल याबद्दल कै० तेलंगांसारख्या थोर थोर गृहस्थांस देखील फार भीति व काळजी वाटत होती. पण आमच्या आपटे, आगरकर व गोळे इ० सर्व मंडळींनी अत्यंत परिश्रम करून ह्या संस्था उदयास आणिल्या. आणि नेटिव लोकांमध्ये किती कर्तबगारी व स्वातंत्र्याभिमान आहे, ते कृतीने मूर्तिमंत सिद्ध करून दाखविले. याबद्दल त्यांची स्तुति करावी तितकी शोभण्याजोगी आहे. दीर्घोद्योगी पुणेकरांनी कागद करण्याची गिरणी, रेशमाची व सुताची गिरणी, सुया व टांचण्या वगैरे करण्याचा कारखाना, पितळी पत्र्यांच्या वाट्या, तबकें व ताटें इत्यादि पात्रे तयार करण्याचा कारखाना, ही कामें सुरू करून ती उत्तम प्रकारे चालविली आहेत. आलीकडे डेक्कन बँक व मरकंटाईल बँक ह्यांची स्थापना झाली असून त्यांचीही कामें चांगली चालली आहेत. टोनहॉल, सार्वजनिक सभागृह ( जोशीहॉल ), पुणे नेटिव लायब्ररी, फर्ग्युसन कॉलेज, व फीमेल हायस्कूल ह्या इमारती त्या त्या संस्थांच्या स्वतंत्र झाल्या असून त्यांस आतां चांगली बळकटी आली आहे, असें ह्मणण्यास फारशी भीति राहिली नाही. पुण्यामध्ये छापखाने पुष्कळ वाढले असून तेथे निघणाऱ्या वर्तमानपत्रांपैकी काही पत्रे विद्वान व शहाण्या लोकांच्या हातून चालत असल्यामुळे त्यांतील लेख मार्मिक असतात. पुण्याच्या लोकांची भाषा शुद्ध, सर्व कामांत स्वच्छता, टिपेनें