पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९४ ) आतां अशा प्रकारचें अज्ञान त्या लोकांच्या ठिकाणीं कां असावें, ह्याचें कारण शोधीत बसण्याची आवश्यकता दिसत नाहीं. हा वसाहतींच्या इतिहासा- चा विषय फार विस्तृत आहे, हे कदाचित् त्याचें कारण असेल; कदाचित् ह्या विषयाची अरसिकता हेंहि कारण असेल. तथापि ह्या वसाहतींसंबंधानें प्रत्येक ब्रिटिश मनुष्यावर जी एक विलक्षण प्रकारची जबाबदारी आहे, तिची योग्यता तो पूर्णपणें ध्यानांत आणीत नाहीं, हें कारण सर्वांत अधिक संभवनीय दिसतें. परंतु वसाहतीं- संबंधी प्रश्न आणि वसाहती व हिंदुस्थान ह्यांच्या संबं धानें परराष्ट्रांशी उत्पन्न होणारे तंटे बखेडे ह्यांकडे पार्ल- मेंट सभेचा काळ दिवसेंदिवस अधिकाधिक खर्च होणार आहे; व मोठमोठ्या मुत्सद्दयांच्या शहाणपणाचा उपयो- गहि ह्याच विषयासंबंधानें व्हावयाचा आहे. म्हणून •ब्रिटिश राष्ट्राचा प्राचीन इतिहास व त्याची सद्य:स्थिति .ह्यांची माहिती प्रत्येक ब्रिटिश मनुष्यास असणें तर जरूर आहेच; परंतु हिंदुस्थानांतील लोकांच्या हिताहिताचा त्यांच्या हिताहिताशी हल्लीं बराच निकट संबंध झाला ●असल्यामुळे आपणांसहि ती माहिती असणें इष्ट आहे. असो. ह्या वसाहती त्या लोकांनी कशा मिळविल्या हा जो प्रस्तुत विषयाचा पहिला भाग त्याचा प्रथम विचार करूं. कारण त्यांची सद्यःस्थिति समजण्यास पहिली