पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९३ ) प्रकरण तिसरें. ब्रिटिश वसाहतींची पूर्वस्थिति कशी होती व त्या त्यांनी कशा मिळविल्या. अशी एक आख्यायिका सांगतात कीं, एकदां इंग्लंदांतील कोणा एका मुत्सद्द्याला कलोनियल ( वसा- हतींसंबंधी ) स्टेट सेक्रेटरीचें काम पाह- ण्याचा एकाएकी प्रसंग आला. उपोद्घात. तेव्हां हे मुत्सद्दी आपल्या चिटणिसास म्हणाले, "नकाशा आणून ह्या वसाहती कोठकोठें आहेत, हें प्रथमतः आपण पाहि ल्यास बरें होणार नाहीं काय ? " ही आख्यायिका सर्वथा खरी आहे की काय हे पाहण्याचें विशेष कारण नाहीं. तथापि इतकें मानण्यास हरकत नाहीं कीं, वसा- हतसंबंधानें खुद्द इंग्लंदांतील मोठमोठ्या मुत्सद्द्यांना सुद्धां इतकी कमी माहिती होती. आतां इंग्रज लोक हिंदु- स्थानांतील २८ कोटि प्रजेचे प्रत्यक्ष राज्यकर्ते आहेत; व पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र पसरलेल्या १ कोटि इंग्लिश लोकांच्या कल्याणाशीं त्यांचा अप्रत्यक्ष रीतीनें निकट संबंध आहे. ह्या गोष्टी लक्षांत आणिल्या म्हणजे ज्या प्रदेशांसंबंधानें व त्यांतील लोकांच्या संबंधानें ब्रिटिश लोकांवर इतकी जबाबदारी आहे, त्यांच्याविषयी त्यांचे फार अज्ञान आहे, असे म्हणावे लागतें.