पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८५ ) माल अधिक खरेदी करूं लागतील. गेल्या पांच वर्षांत बूट व जोडे ह्यांची मागणी दुप्पट झाली आहे; व ह्याव- रून युरोपांतील ऐपआरामाच्या पदार्थांचा एतद्देशीय लोक उपभोग घेऊं लागले आहेत, ही गोष्ट स्पष्ट आहे. इंग्लंदाशीं व ब्रिटिश वसाहतींशीं हिंदुस्थानचा व्यापार सतत चालू राहील, ह्याविषयींहि शंका घेण्याच कारण नाहीं. हल्ह्रीं ह्या देशाशीं व्यापार करण्याची सर्व देशांना सारखीच मोकळीक आहे; परंतु सर्व जगां- तून ह्या देशांत जो माल येत आहे, त्याच्या १२ पट सुएझ कालव्यांतून किंमतीचा माल, फक्त ग्रेट ब्रिटन व हिंदुस्थानाश आयर्लंद व इंग्लिशांच्या इतर वसाहती, हिंदुस्थानच्या व्यापार. ह्यांतून येत आहे. सर्व व्यापारापैकी ग्रेट ब्रिटन व आयर्लंद ह्यांशी शेंकडा ५६ ह्या प्रमाणानें आहे; फ्रान्साशी शेंकडा ६ प्रमाणानें आहे; व जर्मनीशीं ह्याहूनहि कमी आहे. इ. स. १८८२त सुएझ कालव्यामधून गेलेल्या गलबतांपैकी २,१६५वर इंग्लिश राष्ट्राचे निशाण फडकत होतें; व बाकीच्या सर्व राष्ट्रांची मिळून काय तीं ६३५ च गलबतें होतीं. सुएझ कालव्याचें महत्त्व कोणत्या राष्ट्रास अतिशय आ- हे, ही गोष्ट ह्यावरून स्पष्ट होते. तसेच गेल्या सा- लीं हिंदुस्थानाशी झालेल्या ब्रिटिश व्यापारापैकी शेकडा ८० ह्या कालव्यांतून झाला; व केप ऑफू गुड होपा- 9 १ वरून फक्त १२ झाला. ह्या दोन्ही गोष्टी लक्षांत ४