पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८४ ) व्यापाराच्या वृद्धीचें वर दाखविलेले प्रमाण नकी नसून वास्तविक प्रमाण पुष्कळ अधिक असले पाहिजे, ही गोप्टहि आपण लक्षांत आणिली पाहिजे. " सरासरीनें हिंदुस्थानांतील रेलवेपासून शेकडा ५ टक्के व्याज सुटतें; व पाटबंधाऱ्यांच्या कामांपासून सुमारें शेकडा ६ टक्के सुटतें. " तसेंच, जेव्हां ही पाटबंधाऱ्यांची रीति अधिक पूर्णतेस येईल, तेव्हां हल्लींहूनहि जास्त नफा खचित होईल. हल्ली देखील वायव्येकडील प्रांतांत पाटबंधाऱ्यां पासून शेकडा ८ टक्के व्याज सुटत आहे. तसेंच इ. स. १८७८१७९ च्या दुष्काळामध्ये १५११६ कोटि रुपयांची धान्यें पाटबंधाऱ्यांमुळे वचावली गेली. ह्या पाटबंधायांस एकंदर जो खर्च आला, तो सर्व ह्या एका वर्षांत भरून आला, इतका मोठा फायदा त्या वेळी झाला. (एच्. एस्. कनिंगूह्यम ह्यांचें पुस्तक, पृष्ठ३७ ) गहूं व कापूस हे जिन्नस बाहेर पाठविण्याचा व्यापार उत्तरोत्तर वाढत आहे; व पुढेहि वाढतच जाणार. हह्रीं ज्या मार्गानें इंग्लिशांचे दीर्घ प्रयत्न सुरू आहेत, त्यांच मार्गाने पुढे जसजसे ते सुरू राहतील, तसतसा त्यांनी तयार केलेल्या जिनसांचा खप हिंदुस्थानांत अधिकाधिक होत जाईल; आणि उलट पक्षी इंग्लिशांस लागणारे कच्चे पदार्थ व धान्यें ह्यांचा पुरवठाहि त्यांना हिंदुस्थानांतून अधिकाधिक होऊं लागेल. हिंदुस्थानांतील लोक जितका जितका अधिक माल उत्पन्न करूं लागतील, तितका तितका ते ब्रिटिश "