पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७३ )

 हिंदुस्थानापासून त्यांना जो फायदा होतो तो केवळ तिसऱ्या प्रकारचा, म्हणजे व्यापारासंबंधाचा होय. ह्या व्यापाराचे महत्त्व समजण्यासाठी बऱ्याच आंक- ज्यांची घडमोड करावी लागणार आहे. हे आंकडे हो- तील तितक्या सुलभ व ठोकळ रीतीनें विचारांत घेऊ.
 इ. स. १८१४पर्यंत हिंदुस्थानाशी व्यापार करण्याची सनद फक्त ईस्त इंदिया कंपनीलाच होती. हिंदुस्थानच्या त्या वेळीं व्यापार फारच थोडा होता. व्यापारीची * जरसी अथवा आइल आफ मॅन बेटावरोवर जेवढा इंग्लंडचा व्यापार हल्लीं चालतो तेवढाच तो होता, असें म्हटलें तरी चालेल. तसेंच हिंदु- स्थानांतील लोकांच्या रितीभाती इतक्या ठाम आहेत कीं, युरोप खंडांत तयार झालेले पदार्थ ते कधींहि खरेदी करणार नाहीत, असा त्या वेळचा अजमास होता. इ. स. १८१४ पासून व्यापार करण्याची सर्वांस मुभा मि ळाली व पुढच्या ३० वर्षांत हा व्यापार १८,००,००,००० रुपये किंमतीपर्यंत, म्हणजे कानडा देशाशीं त्यांचा जित- का व्यापार हल्लीं चालत आहे तितका, जवळ जवळ येऊन ठेपला. ही वाढ सर्व जगास आश्चर्यकारक वाटली, परंतु तो केवळ आरंभच होता. इ. स. १८८४त हिंदु- स्थानाशी एकंदर व्यापार १,५४०,०००,००० रुपयांचा


  • ह्या बेटांपैकी पहिले इंग्लंदच्या दक्षिणेस इंग्लिश चानलमध्यें आहे, व दुसरे इंग्लंदच्या पश्चिमेस ऐरिश समुद्रांत आहे.