पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७२ )

माणसांस येथील हवा वाईट असून लहान मुलांस तर घातकच आहे. म्हणून इतर वसाहतींपासून असलेला पहिला फायदा हिंदुस्थानापासून त्यांना मुळींच नाहीं, असे म्हणण्यास काही हरकत नाहीं.
 तर मग दुसरा फायदा तरी आहे किंवा कसें, त्याचा विचार करूं. हिंदुस्थानामुळे त्यांच्या सामर्थ्यांत भर पडत आहे काय ? पडते, असें म्हणतां येईलसें दिसत नाहीं. माल्टा व सौदन येथे हिंदुस्थानांतील सैन्य मदतीस आणिलें होतें, व त्यामुळे इंग्लिशांस यश येऊ- न त्या त्या ठिकाणीं त्यांचे सामर्थ्य वाढलें असें, ह्या संबं- धानें कदाचित् कोणी म्हणतील, परंतु ही गोष्ट क्षुल्लक आहे. हिंदुस्थानांतील एकून एक शिपाई त्यांना कधीं- हि काढितां येणार नाहीं. इतर वसाहतींचें असें नाहीं. त्या त्यांचे स्वतःचें संरक्षण करितात, व प्रसंगी इंग्लि- शांसह मदत करतात, ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. हिंदुस्थानापासून त्यांच्या सामर्थ्यात भर पडत नाहीं एव- ट्रेंच नाहीं, तर हिंदुस्थान ताब्यांत आहे म्हणून पररा- ष्ट्रसंबंधी राजकारस्थानांच्या बाबतीत त्यांना वारंवार मोठी काळजी उप्तन्न होते; आणि रशिया, इजिप्त व ' तुर्कस्थान ह्या देशांशी त्यांचे वारंवार बखेडे पडतात. हिंदुस्थान ताब्यांत नसतें तर त्यांना ह्या वखेड्यांची जरूर नव्हती. सारांश इतर वसाहतींपासून होणारा दुसरा फायदाहि ह्या देशापासन त्यांना होत नाहीं.