Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४ )

पुस्तकांतील संबंध मराठी वाचकांस समजण्यास अवबड आहे असें वाटलें, तेथें स्पष्टीकरणार्थ टिपा दिल्या आहेत. - ब्रिटिश अमलांतील एकंदर वसाहती व देश हीं प्रारंभी एका ठिकाणी दिली आहेत. मूळ पुस्तकांत प्रथम वसाहतीसंबंधी दोन प्रकरणें असून नंतर हिंदुस्थानासंबंधी दोन प्रकरणें आहेत; परंतु हिंदुस्थानासंबंधी प्रकरणें वाचकांस विशेष सुलभ व मनोरंजक वाटण्याचा संभव असल्यामुळे ती येथे प्रथम दिली आहेत; व ह्या फर- काच्या अनुरोधानेंच पुस्तकाच्या नांवांता हे थोडा फरक केला आहे. वसाहतींसंबंधी प्रकरणांचा आपल्या .. देशाशी साक्षात् संबंध नसल्यामुळे ती वाचकांस विशेष महत्त्वाची वाटणार नाहींत ; तथापि ज्या ब्रिटिश राष्ट्रांत आपण सांप्रत राहत आहों, त्याचा विस्तार कसकसा होत गेला, व सांप्रत केवढा आहे, ह्याविषयीं थोडी बहुत माहिती सर्वास असणे आवश्यक आहे, असें कोणीहि कबूल करील. ह्या वसाहतींसंबंधी प्रकरणांतील पहिल्या प्रकरणांत इंग्लंडच्या इतिहासाचा पुष्कळ ठिकाणीं संबंध आला असल्यामुळे बरेच ठिकाणीं टिपा देऊन तो भाग सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत काळी इंग्लंदच्या इतिहासाची थोडी बहुत माहिती मराठी वाचकांसहि असणे इष्ट दिसतें; व ट्रेनिंग कॉलेजाच्या अभ्यासक्रमांत अलीकडे हा विषय सामील करण्याचाहि हेतु हाच असावा.