पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )
प्रस्तावना.

 इंग्लंदांतील लीड्स नांवाच्या शहरांतील यार्कशा- यर कॉलेजांतील प्रोफेसर रानसम, एम्. ए., ह्यांनी त्या शहरांतील मजुरांच्या माहितीसाठी "ब्रिटिश वसाहती आणि हिंदुस्थान" ह्या विषयावर कांहीं व्याख्यानें दिली. हीं व्याख्यानें मजुरांसाठी असल्यामुळे त्यांतील माहिती ठोकळ असणें साहजिकच होतें. शिवाय ती माहिती त्यांनी फार सुलभ रीतीनें सांगितली होती. इंग्लंदांतील मजुरांसाठी दिलेली ही माहिती आपल्या देशांतील पुष्कळांस व विशेषेकरून निवळ मराठी जाणणारांस उपयुक्त व वाचण्यासारखी वाटेल, असें समजून हा प्रयत्न केला आहे. इंग्लंदांत तर ह्या पुस्तकाच्या फार थोड्या अवकाशांत तीन आवृत्ति निघाल्या; ह्यावरून त्या देशांतील लोकांस हा विषय किती पसंत पडला असावा, हें सहज समजेल. शिवाय थोड्याच दिवसांपूर्वी परलोकवासी झालेले प्रसिद्ध प्रोफे- सर सीली ह्यांनीहि ह्या पुस्तकाबद्दल आपली संमति व्यक्त केली होती.
 प्रोफेसर रानसम ह्यांनी आपल्या पुस्तकाची भाषा व्याख्यानपद्धतीचीच ठेविली आहे; परंतु भाषांत- रांत तशी भाषा ठेवणे इष्ट न वाटल्यामुळे बरेच ठिकाणीं भाषेस जुळण्यासारखे फेरफार केले आहेत; व मूळ