Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५१ )

तसेच, ह्या आले. हिंदुस्थानांत एकी नाहीं, ही गोष्ट ह्या बंडाच्या इतिहासावरून स्पष्टपणे दिसून आली. देशांत अनेक जाति व धर्म असल्यामुळे " राष्ट्र " ही संज्ञा ह्याला देतां येत नाहीं; भूगोलविषयक दृष्टीनें मात्र पाहिजे तर ह्या देशास राष्ट्र म्हणतां येईल, ही गोष्टाह ह्या बंडामुळे चांगली कळून आली.
 ह्या बंडामुळे एक मोठा परिणाम घडून आला. ' तो कोणता म्हणाल, तर फारा दिवसांची जी ही ईस्त कंपनीचा इंडिया कंपनी तिचा शेवट. जिच्या संबंधानें शवट. एवढा मोठा इतिहास झाला, व जिने आजपर्यंत इतक्या उलाढाली केल्या, ती कंपनी ह्या बंडामुळे मोडली, आणि तिचा अधिकार ह्यापुढें प्रत्यक्ष इंग्लंदच्या राजा- कडे गेला. हिंदुस्थानाशीं फक्त ह्या कंपनीनेंच व्यापार करावा, अशी जी सनद कंपनीला मिळालेली होती, तिची मुदत संपून बरीच वर्षे झालीं होतीं, व आतां तिचा राज्य- कारभाराचाहि अधिकार गेला. ही जी व्यवस्था झाली ती सर्वांस हितावहच होती.
 ह्या बंडामुळे घडून आलेली आणखी एक मह- त्त्वाची गोष्ट अद्यापि सांगावयाची आहे. आरंभी आरं- भींच्या मोगल बादशहांनंतर सर्व हिंदुस्थान एकछत्री राणी “एंप्रेस" अमलाखालीं कधीं आलें नव्हतें, तें कंप- ( वादशाहीण ) असा किताब घेते. नीनें उत्तम रीतीनें आपल्या अमलाखालीं