पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५०)

सैन्यांतच झाला; म्हणजे त्यांत प्रजेचा कांहीं संबंध नव्ह ता. तसेच, सर्वच नेटिव्ह सैन्य उठलें होतें, असेंहि नाहीं. मुंबई व मद्रास इलाख्यांतील थोडेच शिपाई फितूर झाले होते. बंगाल्यांतील शिपा- यांत देखील पुष्कळ प्रामाणिक राहिले होते. "हिंदु- स्थानांतील लोकांचे बंड " असें स्वरूप ह्या बंडाला कधींच आलें नाहीं. दिल्लीचा वेढा, हावलाक साहेवाची बंडवाल्यांवर चाल, लखनौचा वेढा, अशा आणीबा- णीच्या प्रसंगीं, नेहमींसारखी नेआण करणे, जखमी शिपायांची शुश्रूषा करणें, स्वयंपाक करणें, वगैरे कामें नेटिव्ह शिपायांनीच केलीं; व हिंदुस्थानास स्वतंत्र कर- ण्याचा आव घालून लढणा-या त्या बंडखोरांच्या तोफांच्या मान्यांत सांपडून कदाचित् आपण मरूं, अशाबद्दल 'देखील त्या प्रसंगी त्यांनी पर्वा केली नाहीं. इतकेंच नव्हे, तर इंग्लिशांनी नुकतेच जिंकिलेले जे पंजावांतील शिख लोक ते इंग्लिशांपेक्षां बंगाली लोकांचा अधिक द्वेष करीत; व म्हणून ह्या बंगाली बंडखोरांबरोबर लढण्यास ते एका पायावर तयार असत. त्याचप्रमाणे शेजारच्या हिमालय पर्वताच्या डोंगरांतून राहणारे जे थोडेसे गुरखे लोक होते, ते आरंभी आरंभी इंग्लिशांस फार त्रास देत असत; परंतु ह्या वेळी ते त्यांना अनुकूळ झाले होते. सारांश, फितूर न झालेले नेटिव्ह शिपाई व स्नेही राजां- ची मदत, ह्यांच्या योगानें इंग्लिशांना हॅ बंड मोडितां