पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४४)

 परंतु वरील लढायांतून इंग्लिशांसच नेहमीं जयं कसा मिळत गेला, असा प्रश्न साहजिकच उप्तन्न होतो. ह्या देशांतील लोकांपेक्षां इंग्लिश लोक शूर होते, एव- लढायांतून इंग्लि- ढ्याच उत्तराने ह्या प्रश्नाचें समाधान शांसच नेहमी जय होत नाहीं. कारण स्वयंपाक, बाजा- कां मिळत गेला? रची नेआण, व इतर हलक्या प्रकारची श्रमाचीं कामें हीं इंग्रजांकडून ह्या उष्ण देशांत झालीच नसती; व अर्थात् हीं करण्यास जर त्यांना एतद्देशीय चाकर मिळाले नसते, तर त्यांना उपाशीं मरण्याचाच प्रसंग आला असता. तेव्हां अशा स्थितींत त्यांच्या नुसत्या शौर्याचा काय उपयोग झाला असता? - ह्यावरून त्यांचा नेहमीं जय होण्याचे शौर्याखेरीज आणखी कांहीं कारण असले पाहिजे हे उघड आहे. शिवाय, त्यांनी ज्या लढाया जिंकिल्या त्या ज्या सैन्याच्या जोरा- वर जिंकिल्या, त्या सैन्यांत सर्व इंग्लिश लोकच होते काय? हमेषा नेटिव्ह शिपायांची संख्या इंग्लिश शिपा- यांच्या संख्येच्या कधीं तिप्पट, कधीं पांच पट, अशी असे. ह्यास्तव सैन्यांतील इंग्लिश व नेटिव्ह शिपायांच्या संख्यांच्या प्रमाणाकडे लक्ष दिलें असतां असें दिसून येईल की, नेटिव्ह संस्थानिकांचा इंग्लिशांनी मुख्यत्वें नेटिव्ह शिपायांच्या जोरावरच पराजय केला आहे. साधारणपणे म्हटलें असतां त्यांच्या जयाची कारणें २ होती :- ( १ ) नेटिव्ह राजांचें दौर्बल्य व त्यांच्यांत