पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४३ )

भीति असे; व शेजारच्या संस्थानांतून असणाऱ्या फ्रेंचांच्या कारस्थानांचीहि तिला भीति असे. म्हणून कंपनीच्या दाय्क्तरांचे सक्तीचे हुकूम व गव्हर्नर जन- रांची शांतता ठेवण्याविषयींचीं अभिवचनें सर्व एकी- कडे राहत; व कंपनीला वारंवार युद्धप्रसंग करावे लागू- न वरचेवर मुलूख काबीज करावा लागे.
 म्हैसूरच्या टिपू सुलतानाचा पराभव केला नाहीं तोंच इंग्लिशांस मराठ्यांशी लढावें लागलें. मराठ्यांस जिंकून त्यांच्या मुलखाची चांगली व्यवस्था केल्यानंतर मोगलांच्या मुलखांतून दंगेखोरांस त्यांना हाकून द्यावे लागले. हे झाल्यावर पंजाबांत सिंधु नदीच्या तीरीं राह- णाऱ्या शिख लोकांबरोबर व त्या नदीच्या मुखाशी अस- णाऱ्या सिंध प्रांतांतील अमिरांबरोबर त्यांस लढावे लागले. ह्याप्रमाणें क्रमाक्रमानें हिमालयाच्या दक्षिणेकडील एकून एक संस्थान आपल्या हस्तगत होऊन तेथील राज्यका - रभार आपल्या हाती येईपर्यंत अथवा तेथील संस्थानिक आपणास खंडणी देऊन आपल्या तंत्राने चालण्यास कबूल होईपर्यंत कंपनीस स्वस्थ बसतां येईना. ह्या लढा- . यांसंबंधी कच्ची हकीगत येथें सांगणें अशक्य आहे. एवढें सांगितले म्हणजे पुरे आहे कीं, अयोध्येचें मोठें राज्य इ. स. १८५६ इंग्लिशांनी खालसा केलें, व त्या वेळेपा- सून हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता प्रत्यक्ष जरी नव्हे, तरी वस्तुतः इंग्लिश कंपनीकडे आली.