Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(80)

च्छेनें ज्या लोकांचें कल्याण करण्याचें आपल्या हातीं आले आहे त्यांच्यासाठीं जे आपलें सुखसमाधान, आपलें आरोग्य, फार कशाला, आपले प्राणहि खर्ची घालण्यास तयार असत, अशा प्रकारचे कित्येक नामांकित इंग्लिश घराण्यांतील लोक ह्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये होऊन गेले. ह्या लोकांच्या अमलांत पूर्वीच्या प्रत्येक गोष्टीचें स्वरूप बदलले. ज्या ज्या प्रांतांत इंग्लिशांचा अंमल असे, त्या त्या प्रांतांत व्यवस्था, सुयंत्रित राज्यकार- निर्भयता व उद्योग हीं असत, व ह्यामुळे त्या त्या प्रांतांची भरभराटी असे; आणि ज्यांत अंदाधुंदी, अव्यद- स्था, चोऱ्या व वलात्कार ही सुरू असत, अशा नेटिव्ह संस्थानांशी इंग्लिशांच्या प्रांतांची तुलना केली असतां विलक्षण तफावत दिसून येई.
 भार, ह्याप्रमाणें राज्यव्यवस्थेच्या संबंधानें यश येत होतें, तरी देखील कंपनीच्या लढाया पूर्वीप्रमाणे चालूच होत्या. फ्रेंच लोकांचा पराभव झालाहोता व म्हणून कंपनांच्या वसाहतीवर त्यांजकडून हल्ला होण्याचें भय राहिलें नव्हतें. असें असतां, स्वस्थपणें व्यापार करणें, व मिळालेल्या . मुलखाचा राज्यकारभार चालविणें, ह्याच गोष्टींकडे लक्ष देऊन कंपनी स्वस्थ कां बसली नाहीं, असा प्रश्न . साहजिक उद्भवतो. जी सभा इंग्लंदांत भरत हाच प्रश्न काढीत असत. कंपनीच्या भागीदारांची प्रतिवर्षी असे, त्या सभेत भागीदार हि तसेंच कोणताहि नवीन गव्ह-