पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३८ )

 हिंदुस्थानांतील दुसरा मोठा गव्हर्नर जो वारन हेस्टिग्स् ह्याच्या कारकीर्दीत पार्लमेंटानें हें प्रकरण हातीं घेतलें. ह्याच्या कारकीर्दीतच म- कंपनीच्या राज्यव्यव- स्थेसंबंधानें पार्लमेंटानें द्रास, मुंबई व बंगाल हे तीन इलाखे केलेली सुधारणा. एकत्र करून त्यांजवर वंगालच्या गव्हर्नरास "गव्हर्नर जनरल" असा हुद्दा देऊन मुख्य नेमण्याचा ठराव झाला. ह्या नवीन ठरावाप्रमाणें वारन हेस्टिंग्स् हाच पहिला गव्हर्नर जनरल झाला. दुप्लीसारखाच हेस्टिंग्स् हुशार होता; व दुप्लीनें जो बेत योजिला, परंतु जो त्याला सिद्धीस नेतां आला नाहीं, तो वेत ह्यानें सिद्धीस नेला. कित्येक राजांव- रोवर त्यानें लढाया केल्या, कित्येकांविरुद्ध त्याने खल- बतें केलीं, व सर्व कामांत त्यास यश येत गेलें. हैदरअली हा एक साहसी शिपाई होता, व त्यानें स्व- सामर्थ्यानें आपणास म्हैसूरचा सुलतान केलें होतें, आणि इंग्लिशांस हिंदुस्थानांतून हकलून लावण्याचें भय घातलें होतें. ह्या हैदरअल्लीपासून त्यानें मद्रासचें संरक्षण केलें. अयोध्येच्या राजाविरुद्ध खलबत करून त्याजपासून त्यानें अतोनात पैसा उकळिला; व ह्या पैशानें दायरेक्टर लो- • कांचें शांतवन करून हैदरअलीशी लढाया करण्यांत आले- ला खर्च भरून काढला. आपल्या रयतेस दाबांत आण- ण्यासाठी एखाद्या नेटिव्ह राजानें कंपनीचे शिपाई मदत घेण्याची इच्छा दर्शविल्यास पैसे घेऊन त्या राजास तो मदतहि देत असे.