पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५ )

निघतो. अशा प्रकारचा पुरुष गादीवर आला म्हणजे मुख्य सत्तेचा अर्थात् हास होऊं लागतो. अशीच स्थिति मोगल घराण्याची झाली, व हेंच त्याच्या -हासाचें पहिले कारण झालें.
 २ रें कारण, मोगलांच्या राज्याचा विस्तार इतका मोठा झाला की, एका मनुष्यास त्याजवर अंमल करितां येईना; म्हणून ठिकठिकाणीं सुभेदार नेमून त्या त्या ठिकाणचा अधिकार त्यांच्या हवाली करणें प्राप्त झाले. मोगलांच्या वेळी सुभेदारांस नवाव किंवा राजा म्हणत. आतां वर ज्या प्रकारच्या विलासी बादशहाचें वर्णन केलें आहे, तशा प्रकारचे वादशाह मोगलांच्या गाड़ीवर आले; तेव्हां हे सुभेदार त्यांचा अधिकार तुच्छ मानूं लागले. बादशहांस न विचारितां त्यांनी आपले अधिकार आपल्या मुलांस दिले, मनास मानेल त्याप्रमाणे वागू लागले, व स्वतंत्र राजे बनण्यासाठी त्यांनी हरएक प्रकारचा प्रयत्न केला. शेवटीं परिणाम असा झाला कीं, मोगल बादशाह दुर्बळ होऊन हे सुभेदार किंवा नवाबच प्रबळ झाले.
 अस प्रकार घडले तेव्हां जुन्या हिंदु सरदारांपैकी कांहीं सरदार आपली डोकीं वर काढू लागले; आणि नवाबांचा पक्ष किंवा बादशहांचा पक्ष ह्यांपैकीं ज्या प्रसं- गीं जो आपणांस फायदेशीर दिसेल तो धरून ते हळू हळू बहुतेक स्वतंत्र होत चालले. अशा प्रकारें मागलां-