पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४ )

हिंदुस्थानचे आरंभींचे मोगल बादशाह फार हुशार होते. ८ वा हेन्री व आन राणी ह्यांच्या कारकीर्दीच्या दर- म्यान, म्हणजे १६ व १७ ह्या शतकांत त्यांनीं हिंदु लोकांस व अफगाण लोकांस जिंकून टाकिलें; आणि कांहीं काळपर्यंत बहुतेक हिंदुस्थान देश आपल्या ता- व्यांत आणिला. ह्याप्रमाणें हिंदु, अफगाण व मोगल ह्या तिघांच्याच स्वाऱ्या विशेषेकरून लक्षांत ठेवण्यासा- रख्या आहेत.
 आतां दिल्लीच्या मोगल बादशहांच्या अमलाखाली हिंदुस्थान आलें नाहीं तोंच त्यांच्या अमलांतील मुलूख कमी कमी होत चालला. ह्याची कारणें २ होती:- १ दें कारण, मोगलांचा अंमल पिढीजाद जुलमीच होता, हें होय. ज्या ठिकाणीं निरु- मोगलांच्या सत्तेचा -हास, द्योगाने व विलासाने आयुष्य घालविण्यास फार मोठा मोह उप्तन्न होतो, अशा एशि या खंडांतील देशांत पिढीजाद जुलमी अमलांत सार्वभौम राजांचा स्वभाव हमेषा बिघडतो. पहिला राजा नेहमी सामर्थवान् असलाच पाहिजे; कारण तो असा नसेल तर त्याला राज्य मिळवितांच कसें येईल : त्या राजाचा मुलगा हि बहुधा पराक्रमी निघतो; परंतु राजवाड्यांत जन्मलेला, दासदासींनी जिवापाड श्रम घेऊन वादविलेला व हरएक प्रकारच्या विलासाची सवय लागलेला असा नातू अथवा पणतू अतिशय बिघडतो, व फार दुर्बळ