पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६ )

सिंधूच्या काठच्या प्रदेशात बहुतेक पंजाब येतो; गंगेच्या काठच्या प्रदेशांत बंगाल येतो; आणि डेक्कनमध्यें दक्षिण हिंदुस्थानांतील प्रदेश म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेकडील सर्व प्रदेश येतो. हिंदुस्थानांत अति महत्त्वाचे शहर दिल्ली. गंगेस मिळणारी जी यमुना नदी तिच्या कांठीं हें शहर असून गंगेचें मुख व सिंधूचें मुख ह्या दोहोंपासून सरासरी सार- ख्या अंतरावर मध्यावर आहे. दिल्ली शहर कोठें वसलें आहे ती जागा व हे ३ भाग जर लक्षांत ठेविले, तर हिंदुस्थानच्या इतिहासाविषयीं जें कांहीं पुढें सांगावयाचें आहे तें सहज समजेल. हिंदुस्थानची रचना कशी काय आहे त्याविषयीं आतां विचार करू. साधारणपणे पाहिलें "असतां युरोपांतल्यापेक्षां एशिया खंडांतील प्रत्येक गोष्ट फार अवाढव्य आहे. आल्प्स पर्वत जितका उंच आहे त्याच्या दुप्पट हिमालय पर्वत उंच आहे. हिंदुस्थानांतील नद्याहि युरोपातल्या नद्यांपेक्षां अधिक लांब रुंद आहेत; मैदा जास्त विस्तीर्ण आहेत. एशिया खंडांतील इतर 'त्याच्या क्षेत्रफ- कित्येक देशांशी तुलना करून पाहिलें ळाचा अजमास. असतां हिंदुस्थान देश अगदी लहान दिसतो; तरी युरोपाशीं तुलना केली असतां तो फार विस्तीर्ण देश आहे, असें ध्यानांत येईल. फार कशाला, युरोप खंडांतून रशिया गाळला असतां जो कांहीं प्रदेश 'उरेल, तेवढाच आकार अजमासें हिंदुस्थानाचा आहे. ह्यासाठी फारच क्षुल्लक अशा ग्रीस, स्वित्झरलंद, पोर्तु-