Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुद्धीने एका युद्धांत इंग्लिशांस उत्तम प्रकारची मदत करण्याची इच्छा प्रदर्शित केली वास्तविक रीतीनें पहिले असतां ह्या युद्धाशीं त्यांचा कांहींच संबंध नव्हता; ब्रिटिश राष्ट्रांत त्या मोडतात, एवढाच काय तो त्यांचा संबंध. अशा प्रकारचें उदारपणाचे उदाहरण इतिहासांत सांपडणे फार कठीण. ह्यांपैकी एका वसाहतीच्या मद- तीचा इंग्लिशांनी स्वीकारहि केला. ही वसाहत न्यू साउथ वेल्स होय. तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर लढाई सुरू असतां इंग्लिश शिपायांबरोबर ह्या वसाहतीतील इंग्रज लोक त्यांच्याप्रमाणेच निकराने लढले आहेत. ह्यापुढे जेव्हा जेव्हा एखाद्या राष्ट्राच्या मनांत इंग्लंदावर हल्ला करण्याचा विचार येईल, तेव्हां तेव्हां इंग्लंद म्हणजे युरोपांतील वायव्य दिशेकडील एक लहानसे बेट, असे समजून हल्ला करून उपयोग नाही, तर पृथ्वीवरील लो- कसंख्येच्या लोकसंख्या ज्या राष्ट्रांत आहे, त्या रा प्टाशी लढावयाचे आहे, असे समजून त्यानें चाललं पाहिजे. शेवटीं, ह्या वसाहती इंग्लिशांच्या हातन गेल्या असतां काय परिणाम होईल, ह्याची कल्पना करूं. ब्रिटिश वसाहती ही जर तितकी परकीय राष्ट्र असती, तर त्यां- च्यांशी इंग्लडचा जितका व्यापार १ असता, त्यापेक्षा त्या त्यांच्या ताब्यांतील वसाहती अस ल्यामुळे हल्ली जास्त व्यापार चालत आहे. म्हणून त्या वसाहतींबरोबरचा इंग्लिशांचा व्यापार वडाला असतां हो- णारे परिणाम.